Govt. Scheme

एचडीएफसी बँकेकडून पहिली ते पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थांना शिष्यवृत्ती; त्वरित अर्ज करा | HDFC Bank Scholarship Program 2024-25

मुंबई | एचडीएफसी बँकेने 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीपासून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवले आहेत. एचडीएफसी बँक परिवर्तन योजना (HDFC Bank Parivartan’s ECSS Programme) अंतर्गत ही शिष्यवृत्ती (HDFC Bank Scholarship Program 2024-25) दिली जाणार असून विहित तारखेमध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिष्यवृत्तीचा लाभ कोणी घेऊ शकतो?

  • इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेणारे विद्यार्थी.
  • डिप्लोमा व आयटीआय अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी.
  • पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी.

पात्रतेचे निकष:

  1. मागील शैक्षणिक वर्षात किमान 55% गुण मिळवले असणे आवश्यक.
  2. उमेदवाराचे पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  3. अर्जदार भारताचा रहिवासी असावा.

शिष्यवृत्ती रक्कम: HDFC Bank Scholarship Program 2024-25

विविध शैक्षणिक स्तरांनुसार शिष्यवृत्तीची रक्कम भिन्न असून, आर्थिक मदतीसाठी ही योजना विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

अर्ज प्रक्रिया:

विद्यार्थ्यांनी HDFC बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्ज सादर करताना शैक्षणिक दस्तऐवज, उत्पन्न प्रमाणपत्र, ओळखपत्र व बँक खात्याचा तपशील जोडणे बंधनकारक आहे.

उमेदवारांना शिष्यवृत्तीची आर्थिक रक्कम ही शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच इयत्तेनुसार वेगवेगळी आहे.
इयत्ता आणि अभ्यासक्रमांनुसार शिष्यवृत्तीची रक्कम पुढीलप्रमाणे असेल :

०१.पदव्युत्तर पदवी ( जनरल )३५ हजार रुपये
०२.पदव्युत्तर पदवी ( प्रोफेशनल)७५ हजार रुपये
०३.पदवी ( जनरल)३० हजार रुपये
०४.पदवी ( प्रोफेशनल)२५ ते ५० हजार रुपये
०५.आयटीआय / पॉलिटेक्निक / डिप्लोमा१८ आजार रुपये
०६.इयत्ता ७ वी ते १२ वी (सर्व शाखा) पर्यंत१८ आजार रुपये
०७.इयत्ता १ ली ते ६ वी पर्यंत१५ हजार रुपये

ही कागदपत्र आवश्यक :

सदर शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने पासपोर्ट साईट फोटो , मागील वर्षाचे गुणपत्रक, आधार कार्ड / मतदान कार्ड / वाहन चालविण्याचा परवाना , चालू वर्षाचे (शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चे) शाळा / महाविद्यालयाचे ओळखपत्र / बोनाफाईट / फीस पावती, पालकांचा उत्पनाचा दाखला ही कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया :

पात्र विद्यार्थ्यांनी HDFC Bank Parivartan’s ECSS Program च्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत.

Back to top button