नवीन वर्षात IT क्षेत्रात नोकरीची संधी! पदवीधर उमेदवारांसाठी HCL कंपनीकडून भरती | HCL Recruitment

पुणे | एचसीएल टेकनं त्यांच्या पुणे आणि बेंगळुरू इथल्या ऑफिसेससाठी कर्मचारी भरतीची घोषणा (HCL Recruitment) केली आहे. पुण्यात सीनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर व बेंगळुरू इथे सॉफ्टवेअर डेव्हलपर या पदांसाठी इच्छुकांना अर्ज करता येईल. एचसीएल या आयटी कंपनीच्या पुणे कार्यालयात सीनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपरची पदभरती सुरु आहे. या पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

सीनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर विशिष्ट जबाबदाऱ्या:-
1. नेमून दिलेल्या मॉड्युलमध्ये प्रक्रियेचं पालन होतंय का ते पाहणं.
2. तांत्रिक सल्लागार म्हणून तांत्रिक चर्चांमध्ये सहभागी होणं.
3. उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं टीममधल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करणं.
4. त्यांच्या तांत्रिक क्षमता वाढवण्यासाठी मदत करणं.
5. टीमला कोडींगसाठीचे निकष ठरवून देणं

सॉफ्टवेअर डेव्हलपर विशिष्ट जबाबदाऱ्या:-
1. बग फिक्सिंग.
2. अडहॉक रिक्वेस्टचं निराकरण करणं.
3. क्लाएंटच्या गरजेनुसार मदत देणं.
4. कंपनीच्या फंक्शनल आणि टेक्निकल टीमला आवश्यकतेनुसार मदत देणं.

ज्युनिअर डेव्हलपर्स विशिष्ट जबाबदाऱ्या:-
1. क्लाएंट आणि त्यांच्या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या अंतर्गत टीम्स यांच्याशी संवाद साधणं
2. तांत्रिक मार्गदर्शन करणं 
3. काही नवीन गोष्टींसाठी मदत देणं

एचसीएल टेक ही एचसीएलची उपकंपनी असून नोयडामध्ये त्याचं मुख्य कार्यालय आहे. भारतात अनेक वर्षांपासून या कंपनीचं काम सुरु आहे. कंपनीनं सॉफ्टवेअर क्षेत्रात प्रवेश केल्यापासून अनेक मोठमोठ्या आयटी कंपन्यांसोबत त्यांची स्पर्धा सुरु झाली. आयटीमध्ये सध्या अनेक संधी येत आहेत. एचसीएल टेकनंही पुणे आणि बेंगळुरूमध्ये पदभरती सुरु केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार त्यासाठी नक्कीच अर्ज करू शकतात.