हातकणंगलेत आजी माजींना धूळ चारत अशोकराव मानेंनी आमदारकी खेचून आणली | Hatkanangale Vidhan Sabha Election Result 2024

कोल्हापूर | जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी झाल्याचे चित्र सध्याच्या घडीला पहायला मिळत आहे. हातकणंगले विधानसभा मतदार संघात (Hatkanangale Vidhan Sabha Election Result 2024) देखील विधान सभा निवडणूकीत मोठी उलथापालथ झाली असून याठिकाणी विद्यमान व माजी आमदारांना पराभवाची धूळ चारत महायुतीचे अशोकराव माने विजयी झाले आहेत.

हातकणंगले मतदार संघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने याठिकाणी माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे विद्यमान राजू आवळे यांना महाविकास आघाडीकडून चाचपडतच उमेदवारी दिल्याचे पहायला मिळत होते. त्यामुळे हातकणंगले विधानसभा मतदार संघात बदलाचे वारे वाहत होते. हे वारे महायुतीच्या जनसुराज्य पक्षाचे उमेदवार अशोकराव माने यांच्याकडे गेले असून त्यांनी याठिकाणी आमदारकी खेचून आणली आहे.

278 हातकणंगले
21 फेरी पैकी 21 फेरी अखेर अशोक माने याना ची 46328 आघाडी
( EVM मतमोजणी  पूर्ण )
अशोकराव माने विजयी