२६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज अब्दुल रहमान मक्की याचा ‘हार्ट अटॅक’ने मृत्यु ! Hafiz Abdul Rehman Makki
मुंबई | भारताचा शत्रू आणि वाँटेड दहशतवादी हाफिज अब्दुल रहमान मक्की (Hafiz Abdul Rehman Makki) याचं पाकिस्तानात निधन झालं आहे. तो लश्कर-ए-तैयबाचा (LeT) डेप्युटी चीफ आणि हाफिज मोहम्मद सईदचा नातेवाईक होता. रिपोर्ट्सनुसार, मक्की हार्ट अटॅकने मरण पावला आहे. वर्ष 2023 मध्ये मक्कीला संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशतवादी घोषित केलं होतं. त्या अंतर्गत मक्कीची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली होती. त्याशिवाय हाफिज अब्दुल रहमान मक्कीच्या प्रवासावर आणि शस्त्रांवर प्रतिबंध घालण्यात आले होते.
हाफिजचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु
हाफिज अब्दुल रहमान मक्की शुक्रवारी (दि.२७) हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला आहे. तो मुंबई हल्ल्याचा सूत्रधार, दहशतवादी हाफिज सईदचा मेहुणा आणि प्रतिबंधित जमात-उद-दावाचा उपप्रमुख होता. जमात-उद-दावा (JUD) च्या म्हणण्यानुसार, अब्दुल रहमान मक्की हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होता आणि त्यांच्यावर लाहोरमधील एका खाजगी रुग्णालयात उच्च मधुमेहावर उपचार सुरू होते. जेयूडीच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, ‘मक्काला आज सकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयातच तो मरण पावला.’
टेरर फंडिंग प्रकरणात 6 महिन्यांची झाली होती शिक्षा
JUD (जेयूडी) प्रमुख हाफिज सईदचा मेहुणा मक्की याला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने 2020 मध्ये टेरर फंडिंग प्रकरणात 6 महिन्यांची शिक्षा सुनावली होती. मिळालेल्या माहितीनुसार, टेरर फंडिंग प्रकरणात शिक्षा सुनावल्यानंतर मक्कीने आपल्या हालचाली कमी केल्या होत्या. पाकिस्तान मुताहिदा मुस्लिम लीगने (PMML) एका निवेदनात म्हटले होते की, “मक्की हा कट्टरपंथी इस्लामवादी पाकिस्तानी विचारसरणीचा समर्थक होता.