मोदी है तो मुमकीन है! गुजरात मध्ये पुन्हा भाजपच, विरोधकांचा सुपडासाफ |Gujrat Election Result 2022

मुंबई | संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. याही निवडणूकीत भाजपनं (BJP) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. गुजरातमध्ये (gujrat) भाजपने सलग सातव्यांदा सत्ता मिळवली आहे. या विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेसची (Congress) मात्र वाताहात झाल्याचे पहायला मिळत आहे.

जाहीर झालेल्या निकालांनुसार भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीतील सर्व विक्रम मोडीत काढले आहे. गुजरातमध्ये भाजपने (Gujarat election result 2022) सर्व जुने विक्रम मोडून तब्बल 157 जागांवर विजय मिळवलाय. मतांच्या टक्केवारीचेही विक्रम मोडत भाजपने तब्बल 53 टक्के मतं मिळवली आहेत. त्यामुळे 2022 ते 2027 पर्यंत गुजरातमध्ये भाजपचीच सत्ता असेल हे निश्चित झाले आहे.

या विजयामुळे भाजप गुजरातमध्ये (Gujarat election result 2022) सलग 37 वर्ष राज्य करणारा पक्ष ठरणार आहे. पश्चिम बंगालमध्ये (west bengal election) डाव्यांनी तब्बल 34 वर्ष सरकार चालवलं होतं. हाच विक्रम आता भाजप मोडीत काढणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये डाव्यांनी सलग 34 वर्ष राज्य केलं होतं. 1977 ते 2011 या कालावधीत पश्चिम बंगालमध्ये डावे सत्ते होते. गुजरातमध्ये 2027 मध्ये भाजपच्या सत्तेला 37 वर्षे पूर्ण होतील. हा भाजपचा विक्रम होणार आहे. 1990 ला गुजरातमध्ये भाजप-जनता दल यांनी सरकार स्थापन केले होते. त्यानंतर 1995 पासून सलग 7 वेळा भाजप स्वबळावर सत्तेत आहे.