Saturday, September 23, 2023
HomeCareerगोवा शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती, 1.60 लाख ते 2.60...

गोवा शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती, 1.60 लाख ते 2.60 लाख महिना पगार | GSL Bharti 2023 

पणजी | गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती (GSL Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 11 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे.

 याठिकाणी, मुख्य महाव्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. (GSL Bharti 2023)

शैक्षणिक पात्रता
मुख्य महाव्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक – पदवी, एमबीए, एमएसडब्ल्यू, पोस्ट ग्रॅज्युएशन
वरिष्ठ व्यवस्थापक – BE/ B.Tech, MBA, पोस्ट ग्रॅज्युएशन
व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक – BE/ B.Tech

वेतनश्रेणी –
मुख्य महाव्यवस्थापक – Rs. 1,00,000 – 2,60,000/-
अतिरिक्त महाव्यवस्थापक – Rs. 80,000 -2,20,000/-
वरिष्ठ व्यवस्थापक – Rs. 70,000-2,00,000/-
व्यवस्थापक – Rs. 60,000-1,80,000/-
उपमहाव्यवस्थापक – Rs. 50,000-1,60,000/-

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.

PDF जाहिरात Goa Shipyard Limited Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज कराApply For Goa Shipyard Limited Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटgoashipyard.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular