चेहऱ्यावर डाग आणि सुरकुत्या पडलेत का? तर मग जाणून घ्या ग्रीन टीचे फायदे | Green Tea Face Pack

मुंबई | ग्रीन टीमध्ये विविध प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या त्वचेला अनेक प्रकारे लाभदायक ठरु शकतात. ग्रीन टीचा वापर केवळ सेवनासाठी नव्हे तर त्वचेसाठीही करता येतो. ग्रीन टीमध्ये पॉलीफेनॉल आणि सहा वेगवेगळ्या प्रकारचे कॅटेचिन असतात. ग्रीन टी तुम्हाला सुरकुत्यांपासून वाचवण्यासही मदत करते व तुमची त्वचा निरोगी ठेवण्याचे काम करते. सुरकुत्या दूर करण्यासाठी ग्रीन टीचा वापर करता येऊ शकतो, ते कसं हे जाणून घेऊया.(Green Tea Face Pack)

ग्रीन टी व केळं
तुम्ही त्वचेसाठी ग्रीन टी आणि केळं हेदेखील वापरू शकता. यासाठी एका भांड्यात केळं मॅश करावे. त्यात 1 ते 2 चमचे ग्रीन टी पावडर घाला. या दोन्ही गोष्टी मिक्स करून त्वचेवर लावावे आणि 15 ते 20 मिनिटे राहू द्यावे. थोड्या वेळाने साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवाव. हा घरगुती फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.

ग्रीन टी व नारळाचे तेल
ग्रीन टी बनवा आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवा. आता एका भांड्यात खोबरेल तेल घ्या. त्यात 2 चमचे ग्रीन टी घाला. या दोन्ही गोष्टी नीट मिसळा. हे मिश्रण 5 ते 6 मिनिटे चेहरा आणि मानेवर लावा. 20 मिनिटे त्वचेवर राहू द्या. यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा. तुम्ही ते आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.

ग्रीन टी व ॲवोकॅडो – तुम्ही त्वचेसाठी ग्रीन टी व ॲवोकॅडोचा वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात ॲवोकॅडो कापून मॅश करावी. आता त्यात 2 ते 3 चमचे ग्रीन टी घालावा. हे दोन्ही पदार्थ नीट मिसळावेत. आता या मिश्रणाने चेहरा आणि मानेला काही वेळ मसाज करावा व ते मिश्रण 20 ते 30 मिनिटे तसेच त्वचेवर राहू द्यावे. यानंतर चेहरा व मान साध्या पाण्याने स्वच्छ धुवावा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.

ग्रीन टी व अंड
एका बाऊलमध्ये अंडे फोडून घ्या. त्यामध्ये एक चमचा ग्रीन टी ची पाने घालावीत. हे दोन्ही पदार्थ नीट मिसळावेत. आता हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. 15 ते 20 मिनिटे त्वचेवर राहू द्या. यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. त्यामुळे सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.

ग्रीन टी अँटिऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे ग्रीन टी फेस मास्कचा त्वचेला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. हे केवळ तुमच्या त्वचेचे अकाली वृद्धत्व, अतिनील किरणांपासून होणारे नुकसान, लालसरपणा आणि जळजळ यांपासून संरक्षण करते असे नाही, तर त्यात मुरुमांना दूर करू शकणाऱ्या जीवाणूंशी लढण्याची क्षमता देखील आहे.