सरकारी नोकरीची (Govt Jobs) इच्छा असणाऱ्यांना विविध परिक्षांमधून जावे लागते. यामध्ये लेखी परिक्षा हा महत्वाचा मुद्दा असतो. लेखी परिक्षा देणाऱ्यांनाही नोकरी मिळेल याची शाश्वती नसते. कारण लेखी परिक्षा उत्तीर्ण होणे सर्वांना शक्य नसते. परंतु जर लेखी परिक्षेशिवाय सरकारी नोकरी मिळत असेल तर? हो हे खरं आहे… आज आम्ही तुम्हाला अशाच काही सरकारी नोकऱ्यांबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्हाला परीक्षा न देता मिळू शकतात.
- भारतीय सैन्यात विशेष प्रवेशाद्वारे नोकऱ्या उपलब्ध आहेत. ही पदे NCC उमेदवारांसाठी आहेत. यामध्ये शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी द्यावी लागते. या दोन्ही निकषांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळते. या पद्धतीत भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा नाही.
- लष्कराप्रमाणेच नौदलात थेट नोकऱ्या मिळतात. ही नोकरी एनसीसीच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. जर तुम्ही एनसीसीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला याचा फायदा मिळू शकतो. येथे लेखी परीक्षा होत नसली तरी या नोकऱ्या मिळविण्यासाठी संस्थेचे स्वतःचे निकष आहेत.
- पीएसयूमध्येही विशेष अभ्यासक्रम असलेल्यांना लेखी परीक्षेशिवाय नोकऱ्या दिल्या जातात. PSU मध्ये विशेष प्रवेशासाठी रिक्त जागा आहेत. PSUs मध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL), ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC), आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) सारख्या संस्थांचा समावेश आहे. PSU कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय GATE (Graduate Aptitude Test in Engineering) स्कोअरद्वारे अभियांत्रिकी पदवीधरांची भरती करतात. याशिवाय एमसीए, एमएससी इट, एम टेक, एलएलबी इत्यादी अभ्यासक्रमांसाठी रिक्त जागा असतात. त्यांची ही मुलाखती व्दारे निवड होते.
- उत्तराखंडमध्ये प्राथमिक शिक्षकांची भरती गुणवत्तेच्या आधारावर केली जाते. इतर अनेक राज्यांमध्येही प्राथमिक शिक्षकांची भरती गुणवत्तेच्या आधारेच केली जाते.
- ग्रामीण डाक सेवक पदासाठी भरती देखील लेखी परीक्षेशिवाय केली जाते. त्याचा पगार 15-20 हजारांपर्यंत असतो. यामध्ये 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. या उमेदवारांसाठी पोस्टाने स्वतंत्र निकष निश्चित केले आहेत. उमेदवारांना स्थानिक भाषा येणे गरजेचे असते, तसेच कधी कधी सायकल सारखे वाहन चालवायला येणे ही देखील अट असते.
- काही न्यायालयांमध्ये टायपिस्टच्या रिक्त जागांसाठी फक्त मुलाखत आणि टायपिंग चाचणी घेतली जाते. ज्यामध्ये वेग तपासला जातो. यामध्ये जे योग्य असतील त्यांची निवड केली जाते.
- ITI उमेदवारांना अनेक सरकारी कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून थेट मुलाखतीव्दारे कामाची संधी दिली जाते. लेखी परीक्षेशिवाय नोकरीसाठी अर्ज करता येतो. प्रशिक्षणार्थी म्हणून जॉईन झालेल्यांना काही कालावधी नंतर मुख्य रिक्त जागांवर अर्ज करून पात्रतेनुसार नोकरी मिळवता येते.
- पोलिस खात्यात देखील हवालदार आणि ड्रायव्हरची नोकरी काही विभाग आणि राज्यांमध्ये लेखी परिक्षेशिवाय उपलब्ध आहे. हिमाचल प्रदेश भरतीमध्ये ही प्रक्रिया दिसून येते . येथे अलीकडेच प्रकाशित झालेल्या 1334 रिक्त पदांची भरती शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणीद्वारे केली गेली आहे.