8.1 C
New York
Friday, December 1, 2023

Buy now

शिक्षण फक्त 10वी आणि पगार महिना 69 हजार, तब्बल 75,768 पदांची मोठी भरती | Govt Jobs 2023

मुंबई | कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मेगाभरती (Govt Jobs 2023) जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 75768 रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार असल्याने नोकरीच्या शोधात असलेल्या विविध पात्रताधारकांसाठी ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

सदर भरतीची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून अधिसूचनेनुसार कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 24 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.

वरील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी फॉर्मच्या प्रत्येक फील्डमध्ये योग्य तपशील भरला आहे हे तपासणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल/दुरुस्ती/फेरफार करण्याची परवानगी दिली जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

वेतनश्रेणी – NIA मधील शिपाई पदासाठी वेतन स्तर-1 (रु. 18,000 ते 56,900) आणि इतर सर्व पदांसाठी वेतन स्तर-3 (रु. 21,700-69,100)

PDF जाहिरातSSC GD Constable Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 24 नोव्हेंबर 2023 पासून) –  SSC GD Constable Application 2023
अधिकृत वेबसाईटhttps://ssc.nic.in/

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles