Sunday, September 24, 2023
HomeCareer12 वी उत्तीर्णांना 69 हजार पगाराची सरकारी नोकरी, 7547 रिक्त जागांसाठी त्वरित...

12 वी उत्तीर्णांना 69 हजार पगाराची सरकारी नोकरी, 7547 रिक्त जागांसाठी त्वरित अर्ज करा | Govt Job

मुंबई | देशातील 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कॉन्स्टेबल (कार्यकारी) पदांची मेगाभरती (Govt Job) केली जाणार आहे. कॉन्स्टेबल (कार्यकारी) पदाच्या एकूण 7547 रिक्त जागा भरण्यात येणार असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

कॉन्स्टेबल (कार्यकारी) या पदांसाठी 12 वी पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे. (Govt Job)

वरील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी फॉर्मच्या प्रत्येक फील्डमध्ये योग्य तपशील भरला आहे हे तपासणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल/दुरुस्ती/फेरफार करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

निवड प्रक्रिया – संगणक आधारित परीक्षा (CBE), शारीरिक सहनशक्ती आणि मापन चाचणी (PE&MT), शिफारस केलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी, दस्तऐवज पडताळणी.

 PDF जाहिरात Staff Selection Comission Constable (Executive)  Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराApply For Staff Selection Commission Constable (Executive)  Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटssc.nic.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular