Govt. Scheme

कोल्हापूर: कडबाकुट्टी यंत्र व शेळी गट वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन | Government Scheme 2024

जिल्हा परिषद स्वनिधीतून अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र व शेळी गट वाटप

कोल्हापूर | पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यामार्फत सन 2024-25 मध्ये जिल्हा परिषद स्वनिधीमधून 50 टक्के अनुदानावर (Government Scheme 2024) कडबाकुट्टी यंत्र वाटप आणि 75 टक्के अनुदानावर विधवा, परितक्त्या, दाद्रियरेषेखालील महिलांना 2 शेळी गट वाटप अशा योजना राबविण्यात येत आहेत. पात्र लाभार्थीनी अर्ज करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले आहे.

योजनांचे निकष खालीलप्रमाणे आहेत (Government Scheme 2024)

कडबाकुट्टी यंत्र वाटप- लाभार्थीकडे लहान मोठी किमान 5 जनावरे असावीत, लाभार्थीकडे वैरण उत्पादनासाठी जमीन असावी, वीज जोडणी असावी, लाभार्थीने इतर योजनेतुन कडबाकुट्टी यंत्राचा लाभ घेतलेला नसावा.

2 शेळी गट वाटप- ही योजना जिल्ह्यातील विधवा, परितक्त्या किंवा दाद्रिय रेषेखालील महिला लाभार्थीसाठी आहे, योजनेतील लाभार्थीचे वय 18 ते 60 वर्ष या दरम्यान असावे, लाभार्थीकडे शेळीपालनासाठी पुरेशी जागा उपलब्ध असावी.

योजनांचे अर्ज दि. 15 ऑगस्ट 2024 अखेर पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत पंचायत समिती स्तरावर स्विकारण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Back to top button