8 C
New York
Monday, December 4, 2023

Buy now

‘या’ सरकारी विभागांमध्ये आहेत नोकऱ्याच नोकऱ्या, जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा अन् अर्ज प्रक्रिया | Government Jobs

मुंबई |  केंद्र सरकारने अनेक राज्यांमध्ये सरकारी नोकरीच्या भरतीसाठी (Government Jobs) नोटिफिकेशन्स जारी केले आहेत. या सगळ्या पदांसाठी अर्जाची शेवटची तारीख लवकरच संपणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लगेच या नोकऱ्यांसाठी अर्ज करणे गरजेचे आहे. सदर पदांसाठी उमेदवार पदवीधर असणे गरजेचे आहे, तुम्ही जर पदवीधर असाल तर या पदासाठी अर्ज करू शकता.

सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी

  1. बँक ऑफ महाराष्ट्रकडून एक नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. ज्यात क्रेडिट ऑफिसरच्या पदासाठी भरती होणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत साइट bankofmaharashtra.in वर अर्ज करता येणार आहे. या पदासाठी उमेदवारास 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. यात एकूण 100 पदांची भरती करण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर आहे.
  2. इंडिया एक्झिम बँकेने देखील व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर आहे. या भरती अंतर्गत एकूण 45 पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्यासाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करणारा उमेदवार संबंधित विषयात पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी घेतलेला असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 28 वर्षे असावे.

AIMS मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

सध्या देशातील सर्व अखिल भारतीय वैद्यकीय संस्थांमध्ये मोठी भरती सुरू आहे. जर तुम्ही एम्स नागपूरमध्ये असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही aiimsnagpur.edu.in या अधिकृत साइटवर जाऊन अर्ज करू शकतात. शेवटची तारीख 4 नोव्हेंबर आहे. तर, हार्ड कॉपी जमा करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2023 आहे. उमेदवार एमडी, एमएस, डीएम, एमडीएस किंवा एमसीएच असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय पदानुसार 50/58 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, बिलासपूर यांनी जूनियर रेजिडेंट पदाच्या 141 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साइट aiimsbilaspur.edu.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. जे 7 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 पासून आयोजित केले जाईल. अर्जदाराने DCI द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून BDS उत्तीर्ण केलेले असावे. वॉक-इन-इंटरव्ह्यू प्रशासकीय ब्लॉक, 3रा मजला, एम्स-बिलासपूर, कोठीपुरा, हिमाचल प्रदेश-174037 येथे आयोजित केला जाईल. येथे अर्जासाठी उमेदवारांनी येथील अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

छत्तीसगड पोलीस कॉन्स्टेबल भरती 2023

छत्तीसगड पोलीससाठी एकूण 6000 पदांची भरती केली जाणार आहे. अर्जासाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर असणार आहे. यासाठी cgpolice.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अधिक माहिती घेता येईल. सदर पदांसाठी 5 वी ते 10 वी उत्तीर्ण उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात. यासाठी वयोमर्यादा 18-27 वर्षे आहे.

एमपी एनएचएम भरती 2023

नॅशनल हेल्थ मिशन, एमपी मध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या पदासाठी भरती सुरु आहे. यात एकूण 980 पदांची भरती होणार असून अर्जाची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर आहे. अर्जासाठी तुम्हाला nhmmp.gov.in. या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

MPSC सहाय्यक प्राध्यापक भरती 2023

MPSC अंतर्गत प्राध्यापक पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागणी करण्यात आली आहे. ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात आली असून एकूण 214 सहायक प्राध्यापक पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2023 आहे. अर्ज फक्त ऑनलाइन असतील, त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. (mpsc.gov.in.) निवड केल्यास पगार एक लाखापेक्षा जास्त आहे.

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles