मुंबई | उच्च व तंत्र शिक्षण विभागात लवकरच भरती (Government Job) रिक्त पदांची मोठी भरती केली जाणार आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती PDF GR मध्ये दिलेली आहे.
विभागाद्वारे प्रकाशित नवीन परिपत्रकानुसार, उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या प्राचार्य व शिक्षक/ शिक्षकेत्तर पदांपैकी उच्च स्तरीय सचिव समितीने मान्यता दिलेली एकूण 4738 पदांच्या पदभरतीस संदर्भ क्रमांक 6 च्या शासन पत्रान्वये वित्त विभागाच्या सहमतीने मान्यता दिलेली आहे.
वरील पदांपैकी ‘सहाय्यक प्राध्यापक’ संवर्गातील 1492 पदे भरण्यात आलेली आहेत. मात्र, कोविड – 19 च्या प्रदूर्भावामुळे उद्भवलेली राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता, वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 7 येथील शासन निर्णयान्वये पदभरतीवर निर्बंध आणलेले असल्यामुळे उर्वरित पदांची पदभरती करता आली नव्हती.
मात्र, विद्यार्थ्यांचे हित आणि विभागाची निकड पाहता, केवळ सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील उच्च स्तरिय सचिव समितीने मंजूर केलेल्या 3580 पदांपैकी भरलेली 1492 पदे वजा जाता उर्वरित 2088 पदांच्या पदभरतीस, वित्त विभागाच्या सहमतीने शासनाच्या संदर्भ 10 येथील शासन निर्णयान्वये वित्त विभागाच्या दिनांक 04.05.2020 व दिनांक 24.06.2021 च्या शासन निर्णयातील अट शिथिल करून, पदभरतीस मान्यता देण्यात आलेली आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती PDF GR मध्ये दिलेली आहे.