Career
\’या\’ विविध सरकारी विभागांमध्ये 65 हजारांहून अधिक पदांसाठी भरती सुरू, संधी चुकवू नका | Government Job 2024
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आह. सध्या विविध सरकारी विभागात मोठ्या प्रमाणात भरती सुरू आहे. तब्बल 65 हजारांहून अधिक पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. यामध्ये विविध बँका, पोस्ट ऑफिस, स्टाफ सिलेक्शन कमिशन तसेच इतर सरकारी विभागांमध्ये या नोकऱ्या उपलब्ध आहेत.
या सरकारी नोकऱ्यांसाठी 10वी पास ते पदवी उत्तीर्ण उमेदवारांची आवश्यकता आहे. चला तर या सर्व सरकारी नोकऱ्यांविृषयी सविस्तर जाणून घेऊया..
- इंडिया पोस्ट विभाग भरती – पोस्ट विभाग अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदाच्या 35 हजार पदांवर पात्र उमेदवारांची भरती केली जाणार आहे. यासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. 15 जुलैपूर्वी यासाठी अर्ज करावा लागणार आहे. अर्जाचे शुल्क 100 रुपये आहे. तर वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे आहे. अर्ज करण्यासाठी indiapostgdsonline.gov.in वर जावे लागेल.
- SSC CGL भरती – यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2024 आहे. अर्ज करण्यासाठी ssc.gov.in वर जा. 18 ते 32 वर्षे वयोगटातील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. एकूण 17727 पदांवर भरती होणार आहे.
- IBPS लिपिक भरती – बँकीग क्षेत्रातील लिपिक पदे भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना देखील प्रसिद्ध झाली आहे. या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी लिपिक पदासाठी उमेदवारांची निवड केली जाईल. पदवी पास उमेदवार 21 जुलैपूर्वी अर्ज करू शकतात. एकूण 6128 पदांवर ही भरती केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना47,000 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.
- हरियाणा राज्य सरकार पोलिस भरती – येथे कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी नोंदणी लिंक पुन्हा उघडण्यात आली आहे. यासाठी शेवटची तारीख 8 जुलै आहे. 18 ते 25 वर्षे वयोगटातील 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. एकूण 6000 पदांवर ही भरती होणार आहे.
- बिहार विद्युत विभाग भरती – याठिकाणी 2610 रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही bsphcl.co.in ला भेट देऊ शकता. निवड परीक्षेद्वारे केली जाईल, फी 1500 रुपये आहे. तर निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 58 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.
- उत्तर प्रदेश राज्य सरकार भरती – येथे होमिओपॅथिक फार्मासिस्ट पदांसाठी भरती सुरू आहे. एकूण 397 पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 जुलै 2024 आहे. अर्ज करण्यासाठी आणि तपशील जाणून घेण्यासाठी, उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोग upsssc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.