Tuesday, September 26, 2023
HomeCareerगुगलमध्ये तरुणांसाठी जबरदस्त ऑफर! Google विंटर इटर्नशिपमधून महिना 83 हजार कमाईची संधी

गुगलमध्ये तरुणांसाठी जबरदस्त ऑफर! Google विंटर इटर्नशिपमधून महिना 83 हजार कमाईची संधी

जगप्रसिध्द कंपनी गुगलमध्ये करिअर करण्याची संधी तरूणांना मिळत आहे. गुगल Winter Internship साठी ही संधी देत आहे. या इंटर्नशिप कालावधीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महिना 83 हजार स्टायपेंड देण्यात येणार आहे.

गुगल (Google Winter Internship 2024) तांत्रिकदृष्ट्या कुशल तरुणांच्या शोधात आहे. या इंटर्नशिपच्या माध्यमातून तुम्हाला करिअरच्या सुरुवातीलाच मोठी भरारी घेण्याची संधी मिळणार आहे. अनुभवासोबत गुगलकडून निवड झालेल्या उमेदवारांना स्टायपेंड (Stipend) पण देण्यात येणार आहे. हा अनुभव भविष्यात तुम्हाला उपयोगी ठरेल. त्याआधारे तुम्ही गुगलसह दिग्गज कंपन्यांमध्ये आपले नशीब आजमावू शकता.

गुगलने ही ॲाफर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगसाठी दिली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना, मुख्य उत्पादने आणि सेवांमध्ये भूमिका बजावावी लागेल. गुगलला तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी उमेदवारांची गरज आहे. सर्च क्वालिटी, कंम्युटिंग प्लॅटफॉर्म आणि नेटवर्किंग टेक्नॉलॉजीज विकसीत करणे, व्हिडिओ इनडेक्सिंग, तांत्रिक त्रुटी, चुका शोधणे आणि इतर अनेक टास्क यामध्ये करावे लागणार आहेत.

यामध्ये उमेदवारांना गुगलची सध्याची उत्पादने आणि सेवा यामध्ये सुधारणा करण्यासाठी, त्या विकसीत करण्यासाठी, सॉफ्टवेअर एप्लिकेशन रिसर्च करणे, कॉन्सेप्ट तयार करणे, डेव्हलप करणे या संधी मिळणार आहेत.

महत्वाचे मुद्दे

वेतन : 83,947 रुपये प्रति महिना
नोकरीचे स्थान : बेंगळुरु आणि हैदराबाद
अंतिम तारीख : 1 ऑक्टोबर 2023 पूर्वी अर्ज करावा लागेल
कालावधी : जानेवारी 2024 ते पुढील 22-24 आठवडे
कसा करणार अर्ज : तुमचा अद्ययावत सीव्ही, बायोडाटा तयार ठेवा. गुगलच्या संबंधित वेबसाईटवर जाऊन रिझ्युम सेक्शन निवडा. तिथे बायोडाटा अपलोड करा. या ठिकाणी आवश्यक ती माहिती तपशीलासह भरा. योग्य माहिती जमा करा. तुम्हाला नोकरीसाठी बंगळुरु, हैदराबाद यापैकी कोणतेही स्थान योग्य वाटते, ते निवडा.

या लिंकवर पाठवा अर्ज : https://cse.noticebard.com/internships/google-winter-internship-2024/

आवश्यक पात्रता

गुगलने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इंटर्नशिपची ऑफर दिली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना, मुख्य उत्पादने आणि सेवांमध्ये भूमिका निभवावी लागेल. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील पदवी, मास्टर डिग्री आवश्यक आहे. C, C++, Java, JavaScript, Python या भाषेचे ज्ञान असावे. कोडिंगची आवड असावी. इतर माहिती तुम्हाला संबंधित लिंक मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular