Saturday, September 23, 2023
HomeCareerगोंडवाना विद्यापीठ अंतर्गत लिपिक, सहाय्यक, शिपाई आणि इतर विविध पदांकरिता भरती |...

गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत लिपिक, सहाय्यक, शिपाई आणि इतर विविध पदांकरिता भरती | Gondwana University Recruitment 2023

गडचिरोली | गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (Gondwana University Recruitment 2023) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी विविध पदांच्या 24 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

सदर पदभरती अंतर्गत “समन्वयक, नियुक्ती अधिकारी सहायक प्राध्यापक, सहायक समन्वयक, ग्रंथालय सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, निम्न विभाग लिपिक, संगणक प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई, सफाई कामगार” पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी, पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. भरलेला अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह (स्वत: प्रमाणित) करून प्राचार्य, मॉडेल डिग्री पीडीएफ कॉलेज, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली या पत्त्यावर जाहिरात प्रसिध्द झालेच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत जमा करावा.

PDF जाहिरात Gondwana University Gadchiroli Bharti 2023
अधिकृत वेबसाईटunigug.ac.in

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवाराचा पूर्वीचा रेकॉर्ड आणि त्याच्या/तिच्या मुलाखतीदरम्यान आवश्यक तेथे कामगिरीच्या आधारे निवड केली जाईल. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही. आवश्यक असल्यास, विद्यापीठ उमेदवारांची निवड करण्यासाठी चाचणी घेईल. शॉर्ट-लिस्टेड नसलेल्या/मुलाखतीसाठी न बोलावलेल्या अर्जदारांशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular