बजेटमधील एक घोषणा अन् सोनं तब्बल 4 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचा दर | Gold Silver Rate Today 24 July 2024
MCX वर सोने- चांदीचा दर काय?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) ५ ऑगस्ट डिलिव्हरी सोन्याचा दर आज प्रति १० ग्रॅम ६८,७७१ रुपयांवर आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ८५ हजारांवर आहे. सोन्यावरील कस्टम ड्युटीत कपात करण्याच्या घोषणेनंतर काल मंगळवारी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६८,५०० रुपयांपर्यंत खाली आला होता. यामुळे सोने प्रति १० ग्रॅममागे ४,२१८ रुपयांनी स्वस्त झाले होते.
Gold Silver Rate Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी केल्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या तासा भरातच सोनं आणि चांदीच्या दरात (Gold Price in India) मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळालं. यामुळं मुंबईसह राज्यभरात सोनं आणि चांदी स्वस्त झाली.
गुड रिटर्न्सनुसार, अर्थसंकल्पापूर्वी 24 कॅरेट सोन्याचे दर 73 हजार 580 रूपये प्रती 10 ग्रॅम होते. त्यात घसरण होऊन हे दर 70 हजार 860 रूपयांवर आलेत. 22 कॅरेट सोनं 2750 रूपयांनी घसरून दर 64 हजार 950 रूपयांवर तर 18 कॅरेट सोन्याचे दर कोसळून 53 हजार 140 रूपयांवर आलेत. आज देखील सोन्याचे दर दुपारनंतर आणखी खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्याचबरोबर अर्थसंकल्पानंतर चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळाले होते. काल अर्थसंकल्पापूर्वी 91 हजार 500 रूपये प्रति किलो होता, तोच दर बजेट सादर झाल्यानंतर 88 हजार रूपये प्रतिकिलोवर आला. त्यानंतर आज चांदीच्या दरात आणखी 500 रूपयांची घसरण होऊन दर 87 हजार 500 रूपयांवर आला आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 73,218 रुपयावरुन थेट 69,602, 23 कॅरेट 72,925 रुपयांहून 69,323, 22 कॅरेट सोने 67,068 रुपयांहून 63,755 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट 54,914 नाही तर आता 52,202 रुपये, 14 कॅरेट सोने 42,833 रुपये आता 40,717 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 88,196 रुपयांहून आता 84,919 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
Gold Price Today : शुद्ध सोने कसे ओळखाल?
सराफा बाजारात २४ कॅरेट (९९९) हे शुद्ध सोने समजण्यात येते. पण, दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असा उल्लेख केलेला असतो. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.