News
सोन्या चांदीचे दर गडगडले, खरेदीची घाई करा | Gold Silver Rate Today
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काल शुक्रवारी (13 डिसेंबर) सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळाले होते. त्यानंतर आजदेखील (14 डिसेंबर) सोन्याच्या भावात घसरण झाली आहे.
शनिवारी सोन्याच्या दरात 900 रुपयांनी घट झाली आहे. या घसरणीसह 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,300 रुपयांपर्यंत खाली आला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 980 ने घसरला असून 78870 रुपयांच्या आसपास खाली आला आहे.
दुसरीकडे चांदीच्या दरातही 1000 ने घट झाली आहे. आज चांदीचा भाव प्रतिकिलो 92,500 रुपये झाला आहे. कालच्या तुलनेत चांदीचा भाव 3,000 रुपयांनी घसरला आहे. काल चांदीचा भाव 93,500 रुपये होता.