News

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय आहे सोन्याचा दर? 2025 मध्ये कसे राहतील मौल्यवान धातूंचे भाव.. जाणून घ्या | Gold Silver Rate 2025

Hello Kolhapur: online Team – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भारतातील सोने चांदींच्या किमतीत (Gold Silver Rate 2025) काय उलथापालथ झाली आहे. जागतिक बाजारपेठेचा यावर काय परिणाम झाला आहे. याची माहिती या बातमीतून आपण घेणार आहोत. कारण भारतातील सोन्याच्या किमती प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील ट्रेंडनुसार बदलतात. विशेषत: लंडन ओटीसी आणि कॉमेक्स सारख्या बाजारपेठांमधील ट्रेंड महत्त्वाची भूमिका पार पाडतात.

आज जागतिक बाजारपेठेचा ट्रेंड पाहता सोने चांदीच्या दरात वाढ झाली, ज्यामुळे खरेदीदारांची चिंता वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील ट्रेंड, विशेषत: लंडन ओटीसी आणि कॉमेक्स बाजारांमध्ये घडणाऱ्या घडामोडी, भारतातील सोन्याच्या किमतींवर थेट परिणाम करतात.

जागतिक स्तरावर सोन्याचा अंदाज

जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसचे ईबीजी – कमोडिटी आणि करन्सी रिसर्च विभागाचे उपाध्यक्ष प्रणव मेर यांनी सांगितले की, “सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे महत्त्व येत्या वर्षभरात वाढण्याची शक्यता आहे. 2024 मध्ये जागतिक स्तरावर सोन्याची किंमत 2900 ते 3000 डॉलरपर्यंत पोहोचेल, तर भारतात 84,000 ते 85,000 रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. एकूण किंमतीमध्ये 5-7 टक्क्यांचा मध्यम परतावा मिळेल.”

भारतातील सोन्याच्या किंमती (1जानेवारी 2025) गुडरिटर्न्सनुसार

24 कॅरेट सोन्याचा दर: 78,000 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट सोन्याचा दर: 71,500 रुपये प्रति 10 ग्रॅम

मुंबईतील सोन्या-चांदीचे दर

मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 78,000 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. काल हाच दर म्हणजेच 31 डिसेंबरला हा दर 77,560 रुपये होता.
चांदीचा दरात मात्र कोणतीही वाढ झालेली नसून 90,500 रुपये प्रति किलोग्रॅम आहे, जो 31 डिसेंबरला 90,500 रुपयेच होता.

2024 मधील मौल्यवान धातूंची कामगिरी

भू-राजकीय ताणतणाव आणि जागतिक पातळीवरील अनिश्चिततेमुळे देशांतर्गत बाजारात प्रति 10 ग्रॅम 85,000 रुपये आणि अगदी 90,000 रुपयांपर्यंत नवीन वर्षात सोन्याची विक्रमी दौड सुरू राहण्याची शक्यता आहे. आगामी वर्षाबाबत विश्लेषकांचे हे महत्त्वाकांक्षी कयास असले, तरी सरलेल्या 2025 मध्येच गुंतवणुकीवर सर्वोत्तम लाभ देणारी ही मालमत्ता ठरली आहे.

सोन्याने सर्वोत्तम कामगिरीसह 2024 मध्ये देशांतर्गत बाजारात 23 टक्के असा अभूतपूर्व परतावा दिला आहे. या वर्षी 30 ऑक्टोबरला मौल्यवान धातूने 82,400 रुपये प्रति 10 ग्रॅमचा सार्वकालिक उच्चांक गाठला. चांदीने 30 टक्क्यांच्या परताव्यासह या उत्कृष्ट कामगिरीला साथ देत, प्रतिकिलो 1 लाख रुपयांची पातळीही ओलांडली.

Back to top button