News

‘या’ एका निर्णयामुळं आज सोनं झालं स्वस्त; ‘इतक्या’ रूपयांनी घसरले दर, जाणून घ्या आजचे नवीन बाजारभाव | Gold Silver Rate

मुंबई | कमोडिटी बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात चांगलीच घसरण (Gold Silver Rate) झाल्याची पहायला मिळत आहे. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे भाव कोसळले आहेत. तर, चांदीचे दरही 2243 रुपयांनी घसरून 88,137 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत. कालच्या क्लोजिंग भावापेक्षा 2.48 टक्क्यांनी घसरली आहे. काल चांदी 2.48 टक्क्याने घसरली होती. एका बातमीमुळं सोन्या-चांदीच्या दरात इतकी घट झाली आहे.  

अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेकडून बुधवारी व्याज दरात कपात करण्यात आली आहे. व्याजदरात 0.25 टक्क्यांपर्यंत घट करण्यात आलीय, त्यामुळं आउटलूक कमोजर झाल्याने या मौल्यवान धातुच्या दरात घसरण झाली आहे. फेडरल बँकेच्या निर्णयामुळे डॉलर निर्देशांक एक टक्क्याने वाढून दोन वर्षांत प्रथमच 108 वर पोहोचला आणि 10 वर्षांच्या यूएस बॉण्ड उत्पन्नाने साडेचार टक्क्यांच्या वर सात महिन्यांच्या उच्चांकावर झेप घेतली. यामुळे सोन्याचा भाव 60 डॉलरपर्यंत घसरला आणि चांदी 3.5 टक्क्यांनी घसरून 30 डॉलरच्या खाली गेली. त्यामुळे आज देशांतर्गत वायदे बाजारात देखील याचा परिणाम होऊन दरात घसरण दिसून आली.

सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या दरात 710 रुपयांची घसरण झाली असून आज प्रतितोळा भाव 77,130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 650 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोन्याचे भाव 70,700 रुपयांवर पोहोचले आहे. 18 कॅरेट सोन्याचे दर 530 रुपयांनी घसरून 57,850 रुपयांवर पोहोचले आहेत. तीन दिवसांच्या घसरणीनंतर बुधवारी चांदीचा भाव 500 रुपयांनी वाढून 92,000 रुपये किलो झाला. मंगळवारी तो 91,500 रुपये प्रति किलोवर बंद झाला. गेल्या तीन सत्रांत चांदीचा भाव किलोमागे साडेपाच हजार रुपयांनी घसरला आहे. हे दर गुडरिटर्न्स वेबसाईटने अपडेट केले आहेत.

इंडिया बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) नुसार 14 ते 24 कॅरेटचा भाव काय – Gold Silver Price Today

आज सकाळच्या सत्रात इंडिया बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75630 रूपये, 22 कॅरेट सोने 73,810 रूपये, 20 कॅरेट 67,310 रुपये, 18 कॅरेट 61,260 तर 14 कॅरेट सोने 48,780 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

चांदीत देखील घसरण – Silver Price Today

गेल्या आठवड्यात चांदी 5,500 रुपयांनी महागली होती तर आठवड्याच्या शेवटी 5 हजारांनी स्वस्त झाली. या आठवड्यात गुडरिटर्न्सनुसार चांदीच्या किंमतीत गेले तीन दिवस कोणताही बदल पहायला मिळाला नव्हता, परंतु आज चांदीच्या दरात देखील प्रतिकिलो 1000 रूपयांची घसरण झाल्याचे दिसत आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,500 रुपये इतका झाला असून गेले तीन दिवस चांदीचा दर 92,500 रूपयांवर स्थिर होता.

Back to top button