कोल्हापूर | गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात नरमाई दिसून आली होती. त्यामुळे दर काहीसे स्थिर असल्याचेच दिसत होते. मात्र गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
गुडरिटर्न्सनुसार आज सोने दरात प्रति 10 ग्रॅम मागे 550 रूपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे आज 24 कॅरेट सोन्याचे दर सकाळच्या सत्रात 73,310 रूपये झाले आहेत. हेच दर काल 72,760 रूपयांवर होते. आज 22 कॅरेट सोने दर प्रति 10 ग्रॅम 67,200 रूपये झाला आहे. हेच दर काल सराफा बाजार बंद होताना 66,690 रूपयांवर होते. त्यामुळे 22 कॅरेट मध्ये प्रति 10 ग्रॅमला 510 रूपयांची वाढ दिसत आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोने दर आज 54,982 रूपये झाला असून कालच्या तुलनेत 422 रूपयांची वाढ झाली आहे.
आज चांदीच्या दरात देखील चांगलीच वाढ दिसून येत आहे. कालच्या तुलनेत आज चांदी दरात तब्बल 2000 रूपये प्रति किलो दर वाढले आहेत. आज चांदी प्रति किलो 87 हजार रूपयांवर पोहचली असून काल हेच दर 85 हजार प्रति किलो याप्रमाणे होते.
आज कोल्हापूरात 22 कॅरेट सोने दर – Gold Silver Price Today