News

सोनं धडामं! आज 51 हजारावर.. 6 हजारांनी घसरलं तर चांदी 8 हजारांनी उतरली; खरेदीची हीच खरी संधी | Gold Silver Price Today 27 July 2024

मुंबई | केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या आयात शुल्कात कपात केल्यापासून किंमतीमध्ये मोठी घसरण सुरू आहे. आज शुक्रवारी, पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे परवडणाऱ्या दरात सोनं आणि चांदी खरेदीची सुवर्णसंधी ग्राहकांना मिळाली आहे.

सोन्यात स्वस्ताई

18 जुलैपासून सोन्यात स्वस्ताईचे सत्र सुरू आहे. 18 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,750 रुपये होता. 26 जुलै रोजी हा भाव 63,150 रुपयांवर आला. म्हणजे 10 ग्रॅम सोने 5,600 रुपयांनी स्वस्त झाले. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 18 जुलै 74,990 रुपये होता. तो 26 जुलै रोजी 68,880 रुपयांवर आला. अर्थात 10 ग्रॅम म्हणजे सोने 6,110 रुपयांनी स्वस्त झाले.

MCX वर सोने आणि चांदी किती स्वस्त?

19 जुलै रोजी MCX वर सोन्याचा भाव 72,990 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 26 जुलै रोजी MCX बंद झाला तेव्हा सोन्याचा भाव 68,186 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. याचा अर्थ गेल्या आठवडाभरात MCX वर सोने 4,804 रुपये प्रति दहा ग्रॅमने स्वस्त झाले आहे. म्हणजेच या कालावधीत MCX वर सोन्याच्या किंमती 6.58 टक्क्यांनी घटल्या आहेत. 

19 जुलै रोजी एमसीएक्सवर चांदीची किंमत 89,646 रुपये प्रति किलो होती. तर 26 जुलै रोजी एमसीएक्सवर चांदीची किंमत 81,371 रुपये होती. याचा अर्थ गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात किलोमागे 8,275 रुपयांची घट झाली आहे. म्हणजेच एका आठवड्यात MCX वर चांदीच्या दरात 9.23 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटी (आयत शुल्क) कमी करण्यात आल्यापासून या दोन्ही मौल्यवान धातूच्या किंमतीत सातत्याने घट नोंदवली जात आहे.

आज सोन्याच्या दरात गुडरिटर्ननुसार सकाळच्या सत्रात वाढ दाखवण्यात येत आहे.

Gold PurityRate per Gram (INR)
18K₹51750
22K₹63250
24K₹69000

गेल्या वर्षभऱात सोने आणि चांदीच्या दरात जितकी घसरण झालेली नाही तेवढी घसरण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच्या तीन- चार दिवसात झाली आहे. अर्थसंकल्पानंतर लगेचच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आणि झटक्यात सोन्याचा भाव प्रति तोळा 4 हजारांनी घसरला. गेल्या वर्षभरातील ही सर्वात मोठी घसरण होती तर आजही सोन्याच्या दरात घसरणीचे संकेत आहेत.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA)
24 कॅरेट सोने – 68,131 प्रति 10 ग्रॅम
23 कॅरेट सोने – 67,858 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट सोने – 62,408 प्रति 10 ग्रॅम
18 कॅरेट सोने – 51,098 प्रति 10 ग्रॅम
14 कॅरेट सोने – 39,857 प्रति 10 ग्रॅम
शुध्द चांदी दर – 81,271 प्रति 1 किलो

Term22K (₹/gram)24K (₹/gram)
10 Days6,6027,202
20 Days6,6807,288
30 Days6,6767,284
60 Days6,6577,262
90 Days6,6697,275
180 Days6,4046,986
1 Year6,0016,546
2 Years5,5736,079
3 Years5,2825,711
4 Years5,1535,500
5 Years4,9525,253
6 Years4,6864,967
7 Years4,4654,740
8 Years4,2924,561
9 Years4,1374,397

सोने 5000 रुपयांनी स्वस्त

अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी म्हणजेच 22 जुलै रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 72718 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो 23 जुलै रोजी अर्थसंकल्पाच्या दिवशी सुमारे 4000 रुपयांनी कमी होऊन 68,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आला. आज त्यातही मोठी घसरण पाहायला मिळत असून 1117 रुपये प्रति 10 ग्रॅमने दर पुन्हा खाली आले आहेत. यामुळे आता MCX वर सोन्याचा दर 67835 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. याचाच अर्थ गेल्या 3 दिवसांत सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 5000 रुपयांनी कमी झाला आहे.

चांदी 8000 रुपयांनी स्वस्त

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांतच चांदीचा भाव किलोमागे 8000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. 22 जुलै 2024 रोजी MCX वर चांदीची किंमत 89203 रुपये प्रति किलो होती, परंतु बजेटच्या दिवशी चांदीची किंमत सुमारे 5000 रुपये प्रति किलोने कमी झाली. आज पुन्हा ही किंमत 3000 रुपयांनी खाली आली आहे. आज MCX वर चांदी 81891 रुपये प्रति किलोवर व्यापार करत आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत चांदीच्या दरात 8000 रुपयांची घट झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Back to top button