सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; सोनं 3300 ने तर चांदी 1,000 रुपयांनी घसरली, काय आहे आजचा भाव? Gold Silver Price Today
कोल्हापूर | सलग तिसऱ्या दिवशी सोने चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज, शुक्रवार, 20 डिसेंबर 2024 रोजी सोने व चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) मोठी घसरण झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले असून, सोन्याचे दर 3300 रूपये प्रति 100 ग्रॅम मागे घसरलेत. तर चांदी 1000 रूपये प्रति किलो मागे घसरली आहे.
इंडियन बुलिअन्स असोशिएशनच्या रिपोर्टनुसार आज 24 कॅरेट सोन्याचा दर 75 हजार 550 रूपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर 22 कॅरेट सोने दर 73 हजार 730 रूपये, 20 कॅरेट सोने दर 67 हजार 240 रूपये, 18 कॅरेट सोने 61 हजार 190 रूपये तर 14 कॅरेट सोने 48 हजार 730 रूपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
कालच्या तुलनेत दरात मोठी घसरण झाल्याने लग्नसराई दरम्यान सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सराफा बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होताना दिसत आहे. (कालचे दर खालील प्रमाणे)
चांदीचे दर:
चांदीच्या दरात देखील आज आणखी घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा दर 1,000 रुपयांनी कमी होऊन 90,500 रुपयांवर आला आहे. काल हा दर 91,500 रुपये होता. सलग चांदीच्या दरात घसरण सुरू असून गेल्या 3 दिवसांपासून 3000 रूपये प्रतिकिलो दर घसरले आहेत.
सोने चांदीच्या किमतींवर स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय घटकांचा प्रभाव होत आहे. अमेरिकेची आर्थिक स्थिती व फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराच्या निर्णयाचा परिणाम कालपासून देशातील सोन्याच्या बाजारावर दिसून येत आहे.
गुडरिटर्न्स नुसार आजचे 24 कॅरेट सोन्याचे दर खालीलप्रमाणे
अर्थसंकल्पाचा परिणाम:
23 जुलै रोजी अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यावरील आयात शुल्क कमी केले होते, त्यानंतर सोन्याच्या किमतीत थेट 6,000 रुपयांपर्यंत घसरण झाली. यामुळे 82,000 रुपयांच्या शिखरावर असलेले सोन्याचे दर सध्या सातत्याने खाली आल्याचे पहायला मिळत आहेत.
2025 मध्ये सोन्याच्या किमती वाढणार?
तज्ज्ञांच्या मते, 2025 मध्ये सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 90,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. देशांतर्गत लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांसाठी 2025 हे वर्ष फायदेशीर ठरू शकते.
(सूचना: सोन्याच्या किमती वेगवेगळ्या शहरांमध्ये बदलू शकतात. खरेदीपूर्वी स्थानिक बाजारातील दर तपासा.)