News

सोनं 52 हजारांवर, सोन्या -चांदीच्या दरात मोठे बदल; जाणून घ्या आजचे दर एका क्लिकवर | Gold Silver Price Today 1 August 2024

मुंबई | सोने-चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक लागल्यानंतर सोने चांदीचे दर (Gold Silver Price Today) पुन्हा आकाशाकडे झेप घेताना दिसत आहेत. केंद्रीय बजेट सादर झाल्यानंतर दरात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू होती. याला काल बुधवार पासून ब्रेक लागला असून सोन्या चांदीचे दर ग्राहकांच्या खिशाला झळ पोहचवू लागले आहेत.

काल सकाळी 18 कॅरेट सोन्याचा भाव 660 रुपयांनी वाढून 52,370 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला होता. त्यात आज आणखी 410 रूपयांची वाढ झाली असून दर 52,780 रूपयांवर पोहचला आहे.

22 कॅरेट सोन्याचा भाव 660 रूपयांनी वाढून 64000 रूपये झाला होता. त्यात आज आणखी 500 रूपयांची वाढ नोंदवली असून आज 22 कॅरेट सोन्याचा दर 64500 रूपये झाला आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव 870 रुपयांनी वाढून 69,820 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. त्यात आज आणखी 540 रूपयांची वाढ होऊन हा दर 70 हजार 360 रूपये झाला आहे.

सोने दर प्रति ग्रॅम 22 कॅरेट, 24 कॅरेट आणि 18 कॅरेट

Gold TypePrice/10g (₹)Change
22K6,4500+500
24K7,0360+540
18K5,2780+410

आज मुंबईतील 22 कॅरेट सोने दर (रुपये)

ग्रॅमआजकालबदल
1₹ 6,450₹ 6,400+ 50
8₹ 51,600₹ 51,200+ 400
10₹ 64,500₹ 64,000+ 500
100₹ 6,45,000₹ 6,40,000+ 5,000

आज मुंबईतील 24 कॅरेट सोने दर (रुपये)

ग्रॅमआजकालबदल
1₹ 7,036₹ 6,982+ 54
8₹ 56,288₹ 55,856+ 432
10₹ 70,360₹ 69,820+ 540
100₹ 7,03,600₹ 6,98,200+ 5,400

आज मुंबईतील 18 कॅरेट सोने दर (रुपये)

ग्रॅमआजकालबदल
1₹ 5,278₹ 5,237+ 41
8₹ 42,224₹ 41,896+ 328
10₹ 52,780₹ 52,370+ 410
100₹ 5,27,800₹ 5,23,700+ 4,100

मागील 10 दिवसातील मुंबईतील सोने दर (1 ग्रॅम)

दिनांक22 कॅरेट24 कॅरेट
Aug 1, 2024₹ 6,450 (+50)₹ 7,036 (+54)
Jul 31, 2024₹ 6,400 (+80)₹ 6,982 (+87)
Jul 30, 2024₹ 6,320 (-20)₹ 6,895 (-21)
Jul 29, 2024₹ 6,340 (+15)₹ 6,916 (+16)
Jul 28, 2024₹ 6,325 (0)₹ 6,900 (0)
Jul 27, 2024₹ 6,325 (+25)₹ 6,900 (+27)
Jul 26, 2024₹ 6,300 (-100)₹ 6,873 (-109)
Jul 25, 2024₹ 6,400 (-95)₹ 6,982 (-104)
Jul 24, 2024₹ 6,495 (0)₹ 7,086 (0)
Jul 23, 2024₹ 6,495 (-275)₹ 7,086 (-299)

चांदीच्या दरात वाढ सूरू

चांदीच्या दरात देखील आज मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत असून कालच्या तुलनेत 600 रूपयांनी दर वाढले आहेत. आज चांदी प्रतिकिलो 87 हजार 100 रूपये झाली असून काल हेच दर 86,500 रूपये होते. तर दोन दिवसांपूर्वी हेच दर 84 हजार इतके खाली होते. अवघ्या दोन दिवसात चांदीने 3 हजारांपेक्षा जास्त उचल खाल्ल्याने खरेदीदारांच्या खिशाला झळ बसणार आहे.

आज चांदीचे दर प्रति ग्रॅम/किलोग्रॅम (रूपये)

ग्रॅमआजकालबदल
1₹ 87.10₹ 86.50+ 0.60
8₹ 696.80₹ 692+ 4.80
10₹ 871₹ 865+ 6
100₹ 8,710₹ 8,650+ 60
1000₹ 87,100₹ 86,500+ 600
Back to top button