News

सोने दरात मोठी घसरण, सोनं 55 हजारावर; चांदीची मात्र घौडदौड सुरुच.. सोनं खरेदीची संधी चुकवू नका! Gold Price Today on 9 July 2024

मुंबई | जुलै महिन्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदी दरात (Gold – Silver Price Today) मोठे चढ-उतार पहायला मिळाले. जून महिन्यातील घसरणीची भरपाई या दोन्ही मौल्यवान धातूंनी जुलैच्या पहिल्याच आठवड्यात केली होती. या आठवड्यात मात्र सोन्याच्या दरात घसरण सुरू असून चांदीची दर मात्र अजूनही तेजीत असल्याचे दिसत आहे.

जुनमधील शेवटच्या आठवड्यातील मोठ्या घसरणीनंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात सोने 1500 रुपयांनी वधारले (Gold Price Today) होते. त्यामुळे सोन्यात चढउताराचे सत्र दिसत होते. या आठवड्याची सुरुवात मात्र नरमाईने झाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच 8 जुलै रोजी सोने 220 रुपयांनी घसरले. तर आज 9 जुलै रोजी देखील सोने दरात मोठी घसरण पहायला मिळत आहे. गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोने कालच्या तुलनेत 350 रूपयांनी घसरले आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या दरात 380 रूपयांची घसरण पहायला मिळत आहे. आज दुपारनंतर या दरात आणखी बदल दिसू शकतो. आता 22 कॅरेट सोने 67,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 73,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 18 कॅरेट सोने दर 550,20 रूपये प्रति 10 ग्रॅम याप्रमाणे आहे.

सोन्याचे दर (Gold Price Today) :

  • गेल्या आठवड्यात सोन्याने 1500 रुपयांची वाढ झाली होती.
  • या आठवड्याच्या सुरुवातीला 8 जुलै रोजी 220 रुपयांनी घसरले.
  • सकाळच्या सत्रात आणखी घसरणीची शक्यता.
  • 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,250 रुपये प्रति 10 ग्रॅम.
  • 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,350 रुपये प्रति 10 ग्रॅम.
  • 18 कॅरेट सोन्याचा भाव 55,020 रुपये प्रति 10 ग्रॅम.

जून महिन्यात चांदीची चमक पूर्णत फिक्की पडली होती. त्यामुळे सोने चांदीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी दिसत होती. मात्र जुलैच्या पहिल्याच आठवड्यात चांदीने 5,000 रुपयांची उसळी घेतली. जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस देखील चांदी दरात वाढ दिसून आली. तर या आठवड्याच्या सुरुवातीलाही चांदी दरातील वाढ सुरूच आहे. सोमवारी, 8 जुलै रोजी चांदी 200 रुपयांनी वधारल्याचे पहायला मिळाले. गुडरिटर्न्सनुसार, आज एक किलो चांदीचा भाव 95,100 रुपये आहे. तसेच आज सकाळच्या सत्रात (9 जुलै) चांदीत दरवाढीचे संकेत मिळत आहेत.

चांदीचे दर (Silver Price Today):

  • जून महिन्यात चांदीची चमक फिक्की होती.
  • जुलैच्या पहिल्या आठवड्यात 5,000 रुपयांची उसळी घेतली.
  • सोमवारी, 8 जुलै रोजी 200 रुपयांनी वधारली.
  • एक किलो चांदीचा भाव 95,100 रुपये.
  • सकाळच्या सत्रात दरवाढीचे संकेत.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीची तुफान घौडदौड सुरु आहे. 24 कॅरेट सोने 72,746 रुपये, 23 कॅरेट 72,455 रुपये, 22 कॅरेट सोने 66,635 रुपये, 18 कॅरेट 54,560 रुपये, 14 कॅरेट सोने 42,556 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे. एक किलो चांदीचा भाव 91,733 रुपये झाला आहे. 

जगातील अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी उन्हाळ्यात सोन्याची खरेदी वाढवल्याने जून महिन्यात भाव वधारले होते. त्यानंतर जुनच्या अखेरीस या खरेदीला ब्रेक लागल्याने दर घसरू लागले. आता बँकांनी सोने खरेदी बऱ्याच प्रमाणात कमी केल्याने सोन्याचा दरात आणखी नरमाई आल्याचे पहायला मिळत आहे. तर चांदीचा वापर औद्योगिक क्षेत्रात वाढत असल्याने चांदीची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

टीप:

  • वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कोणताही कर किंवा शुल्क नसते.
  • सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश असल्याने भावात तफावत दिसते.
Back to top button