सोने-चांदी खरेदीचा विचार करताय? आधी आजचे दर जाणून घ्या मगच ठरवा… | Gold Price Today on 5 July 2024
सोने खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण पहायला मिळाली होती. मात्र जुलैच्या सुरूवातीपासून (Gold Price Today) परिस्थिती बदलली असून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे सोने खरेदीत गुंतवणूक करणे किंवा दैनंदिन वापरासाठी सोने खरेदी करणाऱ्यांना जादा दरात सोने खरेदी करावे लागणार आहे.
सोन्याच्या दरात जोरदार उसळी (Gold Price Today on 5 July 2024)
जुन महिन्याच्या अखेरीस सोन्याचा दरात मोठी घसरण पहायला मिळाली होती. मात्र गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोन्याच्या दरात वाढ दिसू लागली. या आठवड्याच्या अखेरच्या सत्रात सोन्याने दमदार कामगिरी केली. जुलैच्या सुरवातीलाच म्हणजेच 2 जुलै रोजी सोन्याच्या दरात 110 रुपयांनी वाढ झाली. 3 जुलै रोजी दर स्थिर होते. मात्र 4 जुलै रोजी सोने दरात मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळाले. तब्बल 710 रुपयाच्या दरवाढीने 4 जुलै रोजी सोन्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले. आज सकाळी देखील सोन्याने दरवाढीचे संकेत दिले आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,240 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेट सोने 67,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 14 ते 24 कॅरेटचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी दरात वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. आजच्या सोने दराच्या आकडेवारीनुसार 24 कॅरेट सोने 72,469 रुपये, 23 कॅरेट 72,179 रुपये, 22 कॅरेट सोने 66,382 रुपये झाले आहे. तर 18 कॅरेट सोने 54,352 रुपये, 14 कॅरेट सोने 42,394 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे.
तर चांदी एक किलो दर IBJA नुसाप 90,018 रुपये झाला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. मात्र सराफ बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने वेगवेगळ्या शहरात भावात तफावत दिसून येते.
चांदी चमकली
गेल्या आठवड्यात चांदीची चमक फिक्की पडल्याचे पहायला मिळत होते. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मात्र चांदीची चमक पुन्हा दिसू लागली आहे. 1 जुलै रोजी चांदी 200 रूपये, 2 जुलैला 800 रुपये, 3 जुलैला चांदी 500 रुपये आणि 4 जुलै रोजी तब्बल 1500 रुपयांनी दरवाढ झाली आहे. गुडरिटर्न्स वरील आकडेवारीनुसार, आज एक किलो चांदीचा भाव 93,000 रुपये आहे.
IIFL नुसार मुंबईत प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव – (आज आणि काल)
तुम्ही सोने खरेदीत गुंतवणुकीची योजना आखत असाल तर, आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर तपासा आणि तुलना करा.
ग्राम | आज | काल | किंमत बदल |
---|---|---|---|
सोन्याचा दर 1 ग्रॅम | ₹ 6,638 | ₹ 6,616 | ₹ 22 |
सोन्याचा दर 10 ग्रॅम | ₹ 66,382 | ₹ 66,159 | ₹ 223 |
सोन्याचा दर 12 ग्रॅम | ₹ 79,658 | ₹ 79,391 | ₹ 268 |
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा भाव – (आज आणि काल)
मुंबईत 24K सोन्याचा दर प्रति ग्रॅमची तुलना करू शकता.
ग्राम | आज | काल | किंमत बदल |
---|---|---|---|
सोन्याचा दर 1 ग्रॅम | ₹ 7,247 | ₹ 7,223 | ₹ 24 |
सोन्याचा दर 10 ग्रॅम | ₹ 72,469 | ₹ 72,226 | ₹ 243 |
सोन्याचा दर 12 ग्रॅम | ₹ 86,963 | ₹ 86,671 | ₹ 292 |