Career

गोवा हायकोर्टात पदवीधरांसाठी क्लार्क पदांची मोठी भरती; पगार 19000 ते 63200, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता, वयाची अट काय? Goa High Court Recruitment 2024

पणजी | नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात कारकुन पदांची भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

एकूण १७ पदे भरण्यासाठी जाहिरात जारी करण्यात आली आहे, मात्र यामध्ये असलेली एक महत्वाची अट अशी आहे की, शैक्षणिक पात्रता असून देखील जर का अर्जदाराला दोनपेक्षा अधिक मुलं असतील तर तो या पदासाठी अर्ज करू शकणार नाही.

वय आणि शिक्षण

सदरच्या रिक्त पदांसाठी १८ ते ४५ अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. एससी किंवा एसटीसाठी हीच मर्यादा ५० वर्षांपर्यंत आहे. उमेदवार पदवीधर असणे गरजेचे असून टायपिंगचं ज्ञान असणे गरजेचे आहे. याशिवाय कोंकणी भाषेचे ज्ञान तसेच मराठी भाषा येत असल्यास उत्तम आहे.

अर्जदारांचे अर्जांची छानणी झाल्यानंतर लेखी आणि तोंडी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर रिक्त पदांची भरती केली जाईल. मात्र या पदांसाठी स्पष्टपणे दोनपेक्षा अधिक मुले असतील तर ती व्यक्ती कारकुन पदासाठी अपात्र ठरेल असे नमूद करण्यात आले आहे.

एखाद्या जोडप्याला जर का एक मुल असेल आणि दुसऱ्या प्रसूतीच्यावेळी एकपेक्षा अधिक मुलाचा जन्म झाल्यास त्याची गणना एकच मुल अशी करण्यात येईल, पण ही अट २८ मार्च २००५ पर्यंंत जन्म झालेल्या मुलांसाठीच लागू होते, २००६ पासून जन्मलेल्या मुलांसाठी ही सवलत दिली जाणार नाही.

अर्ज भरताना ही काळजी घ्या

उमेदवारांनी अर्ज केवळ विहित नमुन्यातच सादर करणे आवश्यक आहे. अर्ज डाऊनलोड करून त्यांची प्रिंट काढून अर्जदाराने स्वतःच्या हस्ताक्षरात फक्त निळ्या शाईने भरावा. अर्जासोबत तीन रंगीत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र जोडावेत. त्यापैकी एक छायाचित्र अर्जावर चिकटवावे आणि हस्ताक्षराचा काही भाग छायाचित्रावर आणि उर्वरित भाग अर्जावर अशा पद्धतीने स्वाक्षरी करावी. अधिक माहितीसाठी खालील पीडीएफ पहावी.

PDF जाहिरात – Goa High Court Recruitment 2024

Back to top button