औरंगाबाद | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद (GMC Aurangabad Recruitment) येथे “प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारिका, बहुउद्देशीय कर्मचारी/ तांत्रिक कर्मचारी“ पदांच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज स्वहस्ते पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2023 आहे.
पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारिका, बहुउद्देशीय कर्मचारी/ तांत्रिक कर्मचारी
पद संख्या – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – औरंगाबाद
अर्ज पद्धती – स्वहस्ते
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जानेवारी 2023
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा/ मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी. एस्सी पास2) डी.एम.एल.टी प्रमाणपत्र3) एम.एस.सी आयटी पास4) सुक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेमध्ये किमान १ वर्ष कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
परिचारिका
1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एस्सी नर्सिंग पास2) सरकारी रुग्णालयात किमान ०२ वर्ष कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
बहुउद्देशीय कर्मचारी/ तांत्रिक कर्मचारी
1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून सुक्ष्मजीवशास्त्र विषयातुन एम. एस्सी पास2) एम.एस.सी आयटी पास तसेच संगणक हाताळणीचे ज्ञान असणे आवश्यक३) सरकारी प्रयोगशाळेमध्ये किमान ०१ वर्ष कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य