ठाणे | परिचारिका प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय ठाणे (General Hospital Thane Recruitment) अंतर्गत“ANM & GNM” पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – ANM & GNM
- पदसंख्या – 120 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – ठाणे
- वयोमर्यादा – 17 ते 35 वर्षे
- अर्ज शुल्क –
- ANM –
- मागासवर्गीयांसाठी – रु. 200/-
- खुल्या प्रवर्गासाठी – रु.400/-
- GNM
- मागासवर्गीयांसाठी – रु. 250/-
- खुल्या प्रवर्गासाठी – रु.500/-
- ANM –
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – शुश्रूषा अधिकारी, परिचर्या प्रशिक्षण विभाग, विठ्ठल सायन्ना सामान्य रुणालय, ठाणे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – thane.nic.in
- PDF जाहिरात – shorturl.at/dmpT0
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
GNM | जी. एन. एम. प्रशिक्षणाकरिता महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाची माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (१०+२) शालांत प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परिक्षा शासनमान्य संस्थेतून प्राधान्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (Physics, Chemisrty & Biology) या शास्त्रविषयांसह कमीतकमी खुला प्रवर्गासाठी एकूण ४०% पेक्षा जास्त गुण व मागास प्रवर्गासाठी ३५% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.. |
ANM | ए.एन.एम. प्रशिक्षणाकरिता महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाची माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (१० + २ ) शालांत प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परिक्षा कोणत्याही शाखेतील शासनमान्य संस्थेतून उत्तीर्ण. खुल्या प्रवर्गाकरीता ४०% पेक्षा जास्त गुण व मागास प्रवर्गाकरिता ३५% पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक. |
- ज्या जिल्ह्यात परिचर्या प्रशिक्षण केंद्र नाही अशा उमेदवारांसाठी नजिकच्या कोणत्याही जिल्ह्याच्या प्रशिक्षण केंद्रात अर्ज प्राप्त करून घेता येईल.
- कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार पोस्ट किंवा इतर मार्गाने केला जाणारा नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. वेळोवेळी लावल्या जाणाऱ्या यादया पाहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
- शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सुचनांच्या अधिन राहून ही जाहिरात देण्यात येत आहे.
- जिल्हा रुग्णालय ठाणे येथे नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधकाम प्रस्तावित असल्याने नर्सिंग स्कूल ठाणे यांचे स्थलांतरण करावयाचे आहे. त्यामुळे नवीन प्रवेशित प्रशिक्षणार्थीना वसतिगृह उपलब्ध होणार नाही.
- निवड झालेल्या उमेदवारांच्या व त्यांच्या पालकांच्या परवानगी व लेखी संमतीनुसार त्यांना अनिवासी प्रशिक्षण घ्यावे लागेल.