Tuesday, October 3, 2023
HomeCareerFree IT Courses करायचे आहेत? 'ही' परदेशी विद्यापीठे देतात फ्री कोर्सची संधी;...

Free IT Courses करायचे आहेत? ‘ही’ परदेशी विद्यापीठे देतात फ्री कोर्सची संधी; ‘या’ घ्या लिंक…

डिजिटल क्रांती मुळे सध्याच्या युगाला डिजिटल वर्ल्ड म्हणटले जाते. परंतु ही डिजिटल प्रणाली सुरळीत चालण्यासाठी बॅक एंडला अनेक तंत्रज्ञांची गरज भासते. जेव्हा मार्केटमध्ये अशा विशिष्ट तंत्रज्ञानाची गरज भासते तेव्हा कंपन्या नवीन कर्मचारी नियुक्त करण्यास सुरुवात करतात. म्हणूनच डिजिटल युगात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) या क्षेत्राला फार महत्त्व प्राप्त झाले आहे.

कोणत्याही क्षेत्रात नोकरी मिळवू इच्छित असणाऱ्या व्यक्तीकडे आयटी क्षेत्रातले थोडे ज्ञान असेल तर ती जमेची बाजू मानली जाते. त्यामुळे ऑनलाइन, तसेच ऑफलाइन आयटी अभ्यासक्रमांना सध्या जास्त मागणी आहे. नोकरी मिळवण्याच्या संधी वाढवण्यासाठी मोफत ऑनलाइन कोर्स करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. जागतिक स्तरावरच्या अनेक प्रतिष्ठित संस्था आता विनामूल्य ऑनलाइन आयटी कोर्सेसची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. त्यापैकी काही महत्वाच्या संस्था आणि त्यांच्या कोर्सेसची या लेखात माहिती घेऊया…

1) हार्वर्ड विद्यापीठ Harvard University
हार्वर्ड विद्यापीठ हे अमेरिका देशाच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील केंब्रिज ह्या शहरात स्थित असलेले एक खाजगी संशोधन विद्यापीठ आहे. येथे अनेक फ्री कोर्सेस उपलब्ध आहेत. ज्याच्या मदतीने आपण उत्तम करिअर करू शकता.
– CS50 कम्प्युटर सायन्सची ओळख : या कोर्समध्ये कम्प्युटर सायन्स आणि प्रोग्रामिंग आर्ट्सची माहिती दिली जाते.
– CS50 पायथॉनसह आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ओळख : एआयच्या या प्राथमिक अभ्यासक्रमात पायथॉन लँग्वेजसह मशीन लर्निंग शिकवले जाते.
– CS50 गेम डेव्हलपमेंटची ओळख : या हँड्स-ऑन कोर्समध्ये 2D आणि 3D इंटरअ‍ॅक्टिव्ह गेम डेव्हलपमेंटविषयी शिकण्याची संधी मिळते. या कोर्समध्ये सुपर मारियो ब्रदर्स, पोकेमॉन, अँग्री बर्ड्स यासारख्या गेमचे डिझाइन एक्सप्लोअर करू शकता.

2) कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, आयर्विन
– क्लाउड सिस्टिम्स सॉफ्टवेअर : हा कोर्स क्लाउड कम्प्युटिंग स्पेशलायझेशनमधल्या सिस्टीम इश्यूजचा एक भाग आहे.
– मटेरियल डेटा सायन्सेस आणि इन्फॉर्मेटिक्स : या कोर्समध्ये मटेरियल सायन्स, कम्प्युटेशनल सायन्स, इन्फॉर्मेशन सायन्स, मटेरियल इन्फॉर्मेटिक्समधल्या विषयाचा संक्षिप्त आढावा शिकवला जातो.
– क्लाउड अ‍ॅप्लिकेशन्स : या कोर्सच्या माध्यमातून क्लाउड-नेटिव्ह अ‍ॅप्लिकेशन्सची डेव्हलपमेंट आणि सपोर्टची ओळख होते. अ‍ॅप्लिकेशन्स डेव्हलप करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम पद्धती या कोर्समध्ये शिकवल्या जातात. ऑन-प्रिमाइस अ‍ॅप्लिकेशन्स क्लाउडवर मूव्ह करणे, क्लाउड अ‍ॅप्लिकेशन्सकडून अपेक्षित मूलभूत बिल्डिंग ब्लॉक्स आणि प्रॉपर्टीजचा यामध्ये समावेश होतो.
– सॉफ्टवेअर-डिफाइन्ड नेटवर्किंग : हा कोर्स सॉफ्टवेअर-डिफाइन्ड नेटवर्किंगसारख्या डेटा सेंटर नेटवर्किंग तंत्रज्ञानाची ओळख करून देतो. यात एसडीएनचा इतिहास, डेटा सेंटरमधील नेटवर्कचं वर्णन, कॉन्क्रिट डेटा-सेंटर नेटवर्क आर्किटेक्चर (Microsoft VL2) आणि ट्रॅफिक इंजिनीअरिंग यांचा समावेश आहे.

3) जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
– कम्प्युटिंग फॉर डेटा अ‍ॅनालिसिस : हा कोर्स डेटा विश्लेषण आणि मशीन लर्निंगशी संबंधित प्रोग्रामिंग तंत्रांचा परिचय करून देतो. बहुतेक प्रोग्रामिंग पायथॉन आणि SQLवर आधारित आहे.
– कम्प्युटिंग इन पायथॉन IV : ऑब्जेक्टिव्हज् अँड अल्गोरिदम : ऑब्जेक्ट्स आणि अल्गोरिदमशी संबंधित अभ्यासक्रम असलेल्या कोर्समध्ये कम्प्युटर सायन्सचे बेसिक ज्ञान मिळवता येते. कॉम्प्लेक्स कंट्रोल स्ट्रक्चर्स आणि डेटा स्ट्रक्चर्सबद्दल शिकल्यानंतर प्रोग्राम डेव्हलप करता येतो. यामुळे ऑब्जेक्ट-ओरिएंटेड प्रोग्रामिंगशी संबंधित समस्या योग्य प्रकारे सोडवता येतील.
– जावा प्रोग्रामिंग IIची ओळख : वस्तुनिष्ठ प्रोग्रामिंग आणि अल्गोरिदम : जावा प्रोग्रामिंगच्या पायाभूत अभ्यासक्रमातून प्राप्त केलेली कौशल्ये वृद्धिंगत करून प्रोग्रामिंग प्रॉब्लेममध्ये मांडण्यात आलेल्या संकल्पनांच्या ब्लूप्रिंट्स ठरतील अशा रायटिंग क्लासेसची मूलभूत तत्त्वे शिकता येतील.

4) मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)
मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील एक खाजगी संशोधन विद्यापीठ आहे.
– कम्प्युटर सिस्टीम इंजिनीअरिंग : या क्लासमध्ये कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर प्रणालीतील इंजिनीअरिंग टॉपिक्सचा समावेश आहे. या टॉपिक्समध्ये कंट्रोलिंग कॉम्प्लेक्सिटी तंत्रांचा समावेश आहे. क्लायंट-सर्व्हर डिझाइन, ऑपरेटिंग सिस्टीम वापरून मजबूत मॉड्युलरिटी, नेटवर्क, नेमिंग सिक्युरिटी अँड प्रायव्हसी, फॉल्ट-टॉलरंट सिस्टीम इत्यादींचाही यात समावेश होतो.

5) युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल)
– R प्रोग्रामिंग लँग्वेजसह स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंग : हा कमी कालावधीचा अभ्यासक्रम (6 ते 8 तास) R सॉफ्टवेअर आणि प्रोग्रामिंगची ओळख करून देतो. हा कोर्स विनामूल्य आहे आणि पूर्णपणे ऑनलाइन शिकविला जातो. त्यामुळे सोयीनुसार हा कोर्स करता येतो.
– इंट्रोडक्शन टू स्टॅटिस्टिक्स विथ R : या कोर्समध्ये आपल्याला सांख्यिकींच्या मूलभूत तत्त्वांशी आणि महत्त्वाच्या टेस्ट व लिनिअर रिग्रेशन तंत्रांसह स्वतः विश्लेषण करण्याच्या पद्धतींशी ओळख करून दिली जाते. त्यासाठी Rstudio हे मोफत सॉफ्टवेअर वापरता येते. त्यात R साठी युझर-फ्रेंडली इंटरफेस आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular