मुंबई | परदेशात नोकरी मिळवणे हे अनेकांचे स्वप्न असते. परंतु याबाबत योग्य मार्गदर्शन आणि कन्सल्टिंगच्या नावाखाली होणारी फसवणूक जास्त आहे. त्यामुळे अनेकांना आपल्या स्वप्नांवर पाणी सोडावे लागते. परंतु एक महिला अशी आहे जी परदेशात नोकरी करू इच्छिणाऱ्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम करते. जिज्ञा जोशी असे या महिलेचे नाव असून त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून हजारो लोकांचे परदेशातील नोकरीचे स्वप्न पूर्ण केलं आहे.
जिज्ञा यांनी त्यांची कंपनी खूप वेगळ्या पद्धतीने स्थापन केली आहे आणि हजारो लोकांना करिअर मार्गदर्शन केलं आहे. तसंच त्यांना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. जिज्ञा यांनी त्यामुळेच महिला उद्योजक म्हणून देशभरात नावलौकिक मिळवला आहे. मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्या जिज्ञा यांच्याकडे एलएलबी आणि एमबीए एचआर पदवी आहेत. 12 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी देशभरातील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम केलं आहे.

लग्न झाल्यानंतर त्यांनी अहमदाबादमध्ये प्रीकवर्ल्ड एचआर कन्सल्टन्सी नावाची फर्म सुरू केली आणि इतरांना नोकऱ्या देण्याची जबाबदारी स्वत:वर घेतली. जिज्ञाचा दावा आहे की त्यांनी कधीही कोणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पैसे घेतले नाहीत. त्यांनी आयटी, ऑटोमोबाईल, फार्मा, एज्युकेशन मॅन्युफॅक्चरिंग फायनान्स आणि इतर विविध क्षेत्रात अनेक प्रोजेक्ट केले आहेत.
आतापर्यंत तब्बल 3,000 लोकांना दिले जॉब्स
जिज्ञा सांगते की, 12 वर्षे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर त्यांना जाणवलं की, आता त्यांच्यासारख्या महिलांची स्वप्नं पूर्ण करणे गरजेचे आहे. त्या जिथून येतात तो डुंगरपूर हा आदिवासीबहुल भाग असल्याने त्यांना येथे चांगले परिणाम मिळणार नसल्याचे जाणवले, म्हणून 2 वर्षांपूर्वी जिज्ञा यांनी अहमदाबाद, गुजरात इथे एक सल्लागार फर्म उघडली आणि लोकांना रोजगार मिळवून देण्यास सुरुवात केली. त्यांनी आता 3000 हून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे, त्यापैकी 80% महिला आहेत.
तुम्ही भारतात आणि परदेशातही नोकरीचे पर्याय शोधत असाल, तर तुम्ही www.pracworld.com वर लॉग इन करू शकता आणि माहिती मिळवू शकता.