Saturday, September 23, 2023
HomeCareerFoxconn कंपनीत मेगाभरती, तब्बल 40 हजार कर्मचाऱ्यांच्या भरतीचा अंदाज | Foxconn India...

Foxconn कंपनीत मेगाभरती, तब्बल 40 हजार कर्मचाऱ्यांच्या भरतीचा अंदाज | Foxconn India Recruitment

मुंबई | ॲपल (Apple) ची सर्वात मोठी पुरवठादार असलेली फॉक्सकॉन (Foxconn) कंपनी भारतात मोठी भरती (Foxconn India Recruitment) करणार आहे. फॉक्सकॉनने त्यांची कर्मचारी संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या भारतातील प्रतिनिधीने त्याच्या लिंक्डइन अकाऊंटवरील पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

फॉक्सकॉन कपंनीचे भारतातील प्रतिनिधी व्ही ली यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या 73 व्या वाढदिनी शुभेच्छा देताना ही घोषणा केली. तैवान येथील आयफोन निर्माता कंपनी फॉक्सकॉनच्या तामिळनाडू येथील प्लांटमध्ये आधीपासूनच 40 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. आता ली यांनी कर्मचारी संख्या दुपटीने वाढविण्याची घोषणा केली आहे.

फॉक्सकॉन ही सध्या जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी आहे. या कंपनीसाठी भारत ही एक वेगाने वाढणारी आणि मोठी बाजारपेठ आहे. यामुळे त्यांनी भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये उत्पादन सुविधांचा झपाट्याने विस्तार केला आहे. फॉक्सकॉन चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा विचार करत आहे. आता ते भारतात त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करत आहेत.

व्ही ली यांनी त्यांच्या लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटले आहे, 
“आदरणीय पंतप्रधान, वाढदिवसाच्या शुभेच्छा!. तुमच्या नेतृत्वाखाली सरकारच्या काळात फॉक्सकॉनचा भारतात सुरळीत आणि वेगाने विस्तार झाला आहे. पुढील वर्षी तुम्हाला वाढदिवशी मोठी भेट देण्यासाठी दुपटीने रोजगार निर्मिती, एफडीआय आणि भारतातील व्यवसायाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने आम्ही आणखी कठोर परिश्रम करू.”

गेल्या वर्षीच्या अखेरीस रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, फॉक्सकॉनने पुढील दोन वर्षांमध्ये आणखी 53 हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याची आणि भारतात सुमारे 70 हजार पर्यंत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची योजना आखली आहे. भारत सरकारच्या दोन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले होते. ऑगस्टमध्ये कर्नाटकने घोषणा केली होती की Foxconn राज्यातील दोन प्रकल्पांमध्ये 600 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे. हे प्रकल्प आयफोनसाठी केसिंग कंपोनंट्स आणि चिप उत्पादनासाठी उपकरणे तयार करणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular