कोल्हापूरात पावसाचा जोर ओसरला तरी पंचगंगेची पाणीपातळी 46.2 फूटांवर पोहचली; राधानगरीचे दोन दरवाजे बंद | Kolhapur Flood Update
कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पंचगंगेची पाणीपातळी सातत्याने वाढत आहे. रात्री 9 वाजताच्या माहितीनुसार पंचगंगेची पाणीपातळी 46 फूटांहून अधिक झाली असून कोल्हापूरला महापूराचा धोका कायम आहे.
दरम्यान राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून धरणातून होणारा विसर्ग काहीसा कमी झाला आहे. दुपारी 1 वाजता दरवाजा क्रमांक एक बंद झाला. तर संध्याकाळी 5 वाजून 45 मिनीटानी 3 नंबरचा दरवाजा बंद झाला. सध्या धरणाच्या चार दरवाजे आणि पॉवरहाऊस मधून मिळून 7212 क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे.
दि.26/07/2024
रात्री 10:00 वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
46\’-02\”
( 544.26m )
विसर्ग 65267 Cusecs
( नदी इशारा पातळी 39\’00\” व धोका पातळी – 43\’00\”)
एकुण पाण्याखाली बंधारे – 94
दि.26/07/2024
रात्री 9:00 वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
46\’-01\”
( 544.23m )
विसर्ग 65201 Cusecs
( नदी इशारा पातळी 39\’00\” व धोका पातळी – 43\’00\”)
*एकुण पाण्याखाली बंधारे – 94
कोल्हापूर शहरात पुराचं पाणी शिरायला सुरुवात; पंचगंगा 45 फूटांवर, महापुराचा धोका वाढला | Kolhapur Flood Update
कोल्हापूर (8:45 AM) | कोल्हापुरात पावसाची संततधार (Kolhapur Flood Update) सुरूच असल्याने महापुराचा धोका वाढला आहे. पंचगंगा नदी धोका पातळी ओलांडून सध्या 44.9 फूटावरून वाहत असून पुराचं पाणी शहरात घुसायला सुरुवात झाली आहे.
कुंभारगल्ली, महावीर गार्डन, शाहुपूरी परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. मागील वेळी 47 फुटानंतर शहरात पाणी यायला सुरवात झाली होती. आता मात्र पंचगंगेन 44 फुटांची पातळी गाठताच शहरात पाणी घुसायला सुरवात झाली आहे. ही कोल्हापूरकरांसाठी चिंतेची बाब मानली जात आहे.
धरणक्षेत्रात सुरू असेलल्या अतिवृष्टीमुळं जिल्ह्यातील 91 बंधारे पाण्याखाली गेले आहे. सध्या जिल्ह्यातील राधानगरी, तुळशी, भोगावती तसेच वारणा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असल्याने पुरपरिस्थिती गंभीर होऊ लागली आहे. राधानगरी धरणातून सध्या 10 हजार क्युसेक पेक्षा अधिक विसर्ग सुरू आहे.
दि.26/07/2024
दुपारी 12:00 वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
45\’ 2\”
( 543.95 m )
विसर्ग 64468 Cusecs
( नदी इशारा पातळी 39\’00 \” व धोका पातळी – *43\’00 \”)
एकुण पाण्याखाली बंधारे – 91
राधानगरी धरण एकूण दरवाजे खुले:- 6 (3,4,5,6,7,1)
विसर्ग:-विदु्यत-1500विसर्ग +दरवाजे 8568 विसर्ग= एकूण10068विसर्ग
दि.26/07/2024
सकाळी 8:00 वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
44\’-9\”
( 543.83m )
विसर्ग 64135 Cusecs
( नदी इशारा पातळी 39\’00\” व धोका पातळी – 43\’00\”)
एकुण पाण्याखाली बंधारे – 88
राधानगरी धरणाचे 6 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. काल गुरूवारपासून दरवाजा क्रमांक 3,4,5,6,7,1 उघडले पंचगंगेच्या पाणीपातळी मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने शाळा महाविद्यालयांना आज आणि उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पंचगंगेची पाणीपातळी 44 फूट 9 इंचावर गेली असून धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने पूरग्रस्त भागातील लोकांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील वाहतुकीबरोबरच जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील ७०० हुन अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.