News

सांबर वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी गगनबावडा तालुक्यात पाच जणांना अटक | Hunting Sambar wild animals

गगनबावडा | सांबर वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी (hunting Sambar wild animals) तालुक्यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. गगनबावडा वन विभागाने ही कारवाई केलीय. शिकार केलेले मृत सांबर या आरोपींकडे आढळून आले. हे मृत सांबर मादी जातीचे असून ते गर्भवती असल्याचे शवविच्छेदनात आढळून आले. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून गगनबावडा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील वन विभागाची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी विठ्ठल पाटील, जालंदर पाटील, संजय पाटील, पांडुरंग पाटील आणि सुभाष पाटील (सर्व राहणार निवडे तालुका गगनबावडा) या पाच जणांना अटक केलीय. यावेळी संशयित आरोपींवर प्रथम गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानुसार वरील आरोपींना वन्यजीव संरक्षण अधिनियम कायदा १९७२ अंतर्गत कलम २(१६) ९,५१ व ३९ अन्वये वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गगनबावडा तालुका हा निसर्ग संपन्नतेने नटलेला तालुका आहे. या ठिकाणी अनेक वन्यजीव प्राण्यांचा अधिवास आहे. सांबर, भेकर, हत्ती, कोल्हे रानगवे त्याचबरोबर वाघ अशा वन्य प्राण्यांचा गगनबावडा तालुक्यातील जंगलात नेहमीच आधिवास राहिला आहे. त्यामुळे या ठिकाणी शिकार करणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे.

मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणाहून अनेक जण गगनबावडा तालुक्यात शिकारीसाठी येत असतात. त्यामूळे अशा घटना रोखण्याचे आव्हान वनविभागा समोर आहे. दरम्यान वनविभागाने अटक केलेल्या, आरोपींच्याकडे कसून चौकशी केल्यास आणखी काही लोकांची नावे निष्पन्न होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वरील कारवाई, जी गुरुप्रसाद उपवनसंरक्षक कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली कमलेश पाटील सहाय्यक वनसंरक्षक (वनी व कॅम्प), प्रियांका भवार वनक्षेत्रपाल गगनबावडा, संभाजी चरापले वनपाल निवडे, ओंकार भोसले वनरक्षक निवडे , प्रकाश खाडे वनरक्षक कोदे बु., नितीन शिंदे वनरक्षक साळवण , धोंडीराम नाकडे, मुबारक नाकडे, दादू पाटील व नाथा कांबळे वनसेवक तसेच रेस्क्यू टीम उपस्थित होते .

Back to top button