Tuesday, September 26, 2023
HomeCareerराज्य शासनाच्या 'वित्त विभाग' अंतर्गत लवकरच 'कनिष्ठ लेखापाल' पदांची भरती | Maharashtra...

राज्य शासनाच्या ‘वित्त विभाग’ अंतर्गत लवकरच ‘कनिष्ठ लेखापाल’ पदांची भरती | Maharashtra Govt. Job

मुंबई | राज्य शासनाच्या वित्त विभागात कनिष्ठ लेखापाल पदांची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. सध्या होत असलेली ही भरती स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये शासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरण्यासाठी आहेत. (Maharashtra Govt. Job)

Maharashtra Govt. Job – संचालनालय, लेखा व कोषागारे व अधिनस्त कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरणेबाबत वित्त विभागाचे निर्देश दिले आहेत. सदरची भरती TCS/IBPS कंपनी द्वारे होणार असून हि भरती 17 ऑगस्ट 2023 पासून सुरु होण्याची शक्यता आहे.

शासन वित्त विभागाचे संदर्भ क्र. 4 वरील कार्यालयीन आदेशान्वये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये लेखा व कोषागारे संचालनालयातील ‘कनिष्ठ लेखापाल’ या संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे TCS/IBPS या कंपन्यांमार्फत भरण्याची कार्यवाही प्रचलित नियमानुसार करण्याच्या अनुषंगाने ‘संचालक, लेखा व कोषागारे’ यांना संनियंत्रण व समन्वय अधिकारी (Controlling & Coordinating officer ) म्हणून घोषित करण्यात आले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular