Farming Loan on Kisan Credit Card: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. किसान क्रेडिट कार्ड (KCC) अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयाचा देशभरातील करोडो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे हे कर्ज अवघ्या ४% वार्षिक व्याजदराने उपलब्ध होणार आहे.
किसान क्रेडिट कार्डसाठी कोण पात्र आहे? Farming Loan on Kisan Credit Card
कृषी कामाव्यतिरिक्त मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय, पशुपालन आणि फलोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळू शकतो. अर्जदार हा भारतीय नागरिक असावा आणि त्याचे वय १८ ते ७५ वर्षांच्या दरम्यान असावे.
किसान क्रेडिट कार्ड कुठे मिळेल?
किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी सरकारी, खाजगी बँका, ग्रामीण बँका किंवा सहकारी संस्थांकडे अर्ज करता येतो. अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करता येतो. शेतकरी जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज भरू शकतात. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- जमिनीची कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
शेतकरी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा संबंधित बँकेच्या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) किंवा इतर बँकांच्या संकेतस्थळावर अर्ज भरता येईल.
कर्जावरील व्याज आणि सरकारचे अनुदान
किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना ७% वार्षिक व्याजदराने कर्ज दिले जाते. मात्र, सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ३% व्याज अनुदान देते. जर शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली, तर त्यांना केवळ ४% व्याज भरावे लागेल.
कर्ज फेडण्याची मुदत आणि नियम
- किसान क्रेडिट कार्डवर ५ वर्षांसाठी कर्ज दिले जाते.
- पाच वर्षांनी कार्डाचे नूतनीकरण करावे लागते.
- वर्षातून दोनदा व्याज भरावे लागते.
- वर्षातून एकदा संपूर्ण कर्जाची परतफेड केल्यास व्याज अनुदानाचा लाभ मिळतो.
- कर्ज वेळेवर न भरल्यास ७% व्याज लागू होईल आणि खाते NPA होण्याची शक्यता असते.
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी!
सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकरी कमी व्याजदराने मोठी आर्थिक मदत घेऊ शकतात आणि आपल्या शेतीविषयक गरजा पूर्ण करू शकतात.