News

शेतात मशागत करताना पॉवर टिलरचा विचित्र अपघात; यवलूज येथील शेतकऱ्याचा मृत्यु | Kolhapur News

कोल्हापूर | मशागतीवेळी पॉवर टिलर मागे घेत असताना झालेल्या अपघातात शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. झाडाच्या व पॉवर टिलरच्यामध्ये अडकल्याने ही घटना घडली. यवलूज (ता. पन्हाळा) येथील सागर आनंदा पाटील (वय 43) असे या घटनेत मृत्यु पावलेल्या दुर्दैवी शेतकर्‍याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

सागर पाटील हे पॉवर टिलरच्या सहाय्याने शेतात मशागत करत होते. पॉवर टिलरने मागे घेत असताना पाठीमागील झाडाचा अंदाज न आल्याने पॉवर टिलर व झाड याच्यामध्ये ते अडकून पडले. यामुळे सागर गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सीपीआर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांचा शेतीची मशागत करताना अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यु झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Back to top button