Sunday, September 24, 2023
HomeNewsसुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

मुंबई | सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या (Nitin Desai sucide) केली आहे. कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये देसाईंनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

देसाई यांनी आत्महत्या का केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. असे असतानाच देसाई यांच्यावर मोठे कर्ज होते असे वृत्त समोर येत आहे. नितीन देसाई यांनी सीएफएम या वित्तीय संस्थेकडून 180 कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी घेतले होते. मात्र त्या मुळ रकमेवरील व्याज वाढून कर्जाची रक्कम सुमारे 249 कोटी रुपयांवर पोहोचल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान काही कालावधीनंतर सीएफएम या वित्तीय संस्थेने आपल्याकडील सर्व कर्ज खाते एडलवाइस ॲसेट रिकंस्ट्रक्शन कंपनीकडे सोपवली होती.  दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड न केल्याने एन.डी. स्टुडिओवर जप्तीच्या कारवाईचा प्रस्ताव रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आला होता. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नव्हता. या सर्व नैराश्यातूनच देसाई यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नितीन देसाई यांनी हिंदी, मराठी चित्रपटांसाठी दिग्दर्शन केले आहे. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. 1987 सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. 2005 मध्ये नितीन देसाईंनी मुंबईजवळील कर्जत येथे एनडी स्टुडिओ सुरु केला. 

प्रोडक्शन डिझायनर म्हणूनही ‘लगान’, ‘हम दिल दे छुके सनम’, ‘मिशन काश्मीर’, ‘देवदास’, ‘खाकी’, ‘स्वदेस’ आदी सिनेमांसाठी चंद्रकांत देसाई यांनी काम केले आहे. सन 2000 मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’ आणि 2003 मध्ये ‘देवदास’साठी त्यांना उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या सिनेमासाठी उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळाचा पुरस्कार’ मिळाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular