News

Video पहा: कोल्हापूरकरांनो सावधान! राधानगरी धरण क्षेत्रात विक्रमी पाऊस, धरणाचे सातही दरवाजे उघडले | Radhanagari Dam

कोल्हापूर | कोल्हापुरात गेले काही जोराचा पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील धरणक्षेत्रात देखील पावसाचा तडाखा सुरूच असून राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे उघडले गेलेत. यामुळे राधानगरी धरणातून (Radhanagari Dam) 11,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय.

यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. मंगळवारी संध्याकाळ पासून राधानगरी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे बुधवारी पहाटे 4:50 ते 5:50 या एक तासात तब्बल 5 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. यापूर्वी आठवडाभर दोन दरवाजे सुरु असल्याने आता एकूण 7 ही स्वयंचलित दरवाजे उघडल्याने भोगावती नदीपात्रातील पाण्याच्या विसर्गात वाढ झाली आहे.

पहाटे 4:50 मिनिटांनी क्र 5 चा, 4: 53 मिनिटांनी क्र. 3 चा ,5:16 मिनिटांनी क्र.4 चा , 5: 33 मिनिटांनी क्र.1चा ,5: 55 मिनिटांनी क्र.2 चा असे अवघ्या तासाभरात उर्वरित पाच स्वयंचलित दरवाजे उघडले गेले आहेत. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून पहाटे 6 वाजता 172 मिमी एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

राधानगरी धरण 100% भरल्याने सर्वच्या सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले गेलेत. यामुळे भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पाणलोट क्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाल्याने पंचगंगेची कमी होत असलेली पाणीपातळी सततच्या पावसामुळे पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Back to top button