कोल्हापूर | माजी सैनिक योगदान आरोग्य योजना (ECHS), कोल्हापूर येथे विविध रिक्त पदांची भरती (ECHS Kolhapur Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
ECHS Kolhapur Bharti 2023 – याठिकाणी प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, दंत अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, डेंटल हायजिनिस्ट, चौकीदार, ड्रायव्हर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, सफाईवाला अशा विविध पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – SO ECHS, Stn HQ कोल्हापूर.
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. उमेदवाराने मुलाखतीसाठी 12 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 09:00 वाजता Stn HQ कोल्हापूर येथे पोहोचणे आवश्यक आहे. उमेदवाराने मुलाखतीच्या वेळी 10/मॅट्रिक, 10+2 आणि पदवी/पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा/कोर्सची सर्व मूळ प्रमाणपत्रे/पदवी, कामाचा अनुभव आणि डिस्चार्ज बुक, पीपीओ, सर्व्हिस रेकॉर्ड आणि 2 पीपी आकाराची रंगीत छायाचित्रे सोबत आणावीत.
PDF जाहिरात – ECHS Kolhapur Jobs 2023
अधिकृत वेबसाईट – echs.gov.in