News

रात्रभर पाऊस धो-धो कोसळला; टेकडीवरील बंगला घसरून थेट रस्त्यावर आला! Rain

राज्यातील पुणे, मुंबई, कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात तुफान पाऊस (Rain) कोसळत आहे. पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहर आणि पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये पुरस्थिती गंभीर बनली आहे. लवासामध्ये तर रेकॉर्डब्रेक पाऊस झाला असून यामुळं काही ठिकाणी भुस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यात एक आख्खा बंगलाच भुस्खलनामुळे थेट डोंगरउतारावरून घसरून थेट डांबरी रस्त्यावर आलाय.

लवासामध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस:

पुणे जिल्ह्यातील पुणे शहर , पिंपरी-चिंचवड आणि पश्चिमेकडील सर्व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने अक्षरश: कहर माजवलाय. अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. यामुळं मुळा, मुठा नद्यांना पूर आलाय. खडकवासला, पवना ही धरणं तुडूंब भरली आहेत.

लवासामध्ये अक्षरश: पावसाने सर्व विक्रम मोडीत काढत एका रात्रीत जवळपास 550 मीमीची बरसात केलीय. इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसानं लवासामध्ये काही ठिकाणी भुस्खलन झालं आहे. अशातच डोंगरउताराच्या टेकडीवर बांधण्यात आलेला एक बंगला थेट घसरून रस्त्यावर आलाय. बंगला थेट डोगंरमाथ्यावरून घसरून रस्त्यावर आल्याने मोठी खळबळ उडाली असून यामध्ये कोणतीही जिवीतहानी मात्र झालेली नाही.

Back to top button