मुंबई | तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (DTE Recruitment) अंतर्गत मुंबई, अमरावती, नाशिक, पुणे येथे “विधी अधिकारी” पदाच्या एकुण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – विधी अधिकारी
- पद संख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – मुंबई, अमरावती, नाशिक, पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, 03 महापालिका मार्ग, मुंबई- 400001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.dtemaharashtra.gov.in
- PDF जाहिरात – shorturl.at/mBUV0
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विधी अधिकारी | 1. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा. तो सनदधारक असावा. 2. उमेदवार सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधिश / अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश / प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी असावा. असे उमेदवार उपलबध झाले नाही तर उमेदवारांस विधी विभागातून सेवानिवृत्त सहसचिव / उपसचिव/ कक्ष अधिकारी पदावर काम करणाऱ्या अथवा कोणत्याही शासकीय संस्था किंवा सार्वजनिक उपक्रमासाठी विधी सल्लागार म्हणून किमान २० वर्षाचा अनुभव असावा. 3. उमेदवार सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबत ज्ञानसंपन्न असावा, ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही कार्यक्षमतेने पार पाडू शकेल. 4. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असावे. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
विधी अधिकारी | मुंबई कार्यालय – रु. 70,000/- इतर विभागीय कार्यालय – रु. 50,000/- |
