Tuesday, September 26, 2023
HomeCareer10 वी ते पदवीधरांना तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई येथे नोकरीची संधी, त्वरित अर्ज...

10 वी ते पदवीधरांना तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई येथे नोकरीची संधी, त्वरित अर्ज करा | DTE Mumbai Bharti 2023

मुंबई | महाराष्ट्र तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (DTE Mumbai Bharti 2023) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी विविध पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

याठिकाणी लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, संचालक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे. (DTE Mumbai Bharti 2023)

वयोमर्यादा – लघुलेखक – 18 वर्षे, वरिष्ठ लिपिक, संचालक – 19 वर्षे
अर्ज शुल्क – अराखीव प्रवर्गासाठी – रु. 1000/-, मागासवर्गीय उमेद्वारांकरिता – रु. 900/-

शैक्षणिक पात्रता
लघुलेखक – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, मराठी लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनीट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनीट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनीट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

वरिष्ठ लिपिक – कला, वाणिज्य, विज्ञान किंवा कायदा यापैकी कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी, तसेच संगणक टंकलेखन प्रमाणपत्र किंवा मराठी टंकलेखनात किमान 30 शब्द प्रती मिनीट वेगमर्यादेचे आणि इंग्रजी टंकलेखनात किमान 40 शब्द प्रती मिनीट वेगमर्यादेचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र.

संचालक – अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेली महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची यंत्र अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, अणुविद्युत अभियांत्रिकी, अणुविद्युत व दुरसंचरण अभियांत्रिकी, अणुविद्युत व संचरण अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, संगणक तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, रसायन तंत्रज्ञान, उपकरणीकरण अभियांत्रिकी, औद्योगिक अणुविद्युत अभियांत्रिकी, स्वयंमचल अभियांत्रिकी यापैकी कोणत्याही विद्याशाखेतील पदविका परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने त्यास समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही पदविका परीक्षा उत्तीर्ण.

या भरतीकरिता अर्ज  ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे. उमेदवारास दिनांक 31 ऑगस्ट ते दिनांक 21 सप्टेंबर 2023 या कालावधीत www.jdteromumbai.org.in या वेबपोर्टलवर पदभरती संदर्भातील ऑनलाईन अर्ज उपलब्ध राहील.

PDF जाहिरातDTE Mumbai Vacancy 2023
ऑनलाईन अर्ज कराApplication DTE Mumbai Recruitment 2023

कोणत्याही परिस्थितीत हस्तदेय / टपाल / कुरिअर इत्यांदीद्वारे ऑफलाईन पध्दतीने तसेच ई-मेल अथवा अन्य ऑनलाईन पध्दतीने प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. ऑन लाईन नोंदणी झाल्यानंतर उमेदवारास वैयक्तिक माहिती, अतिरीक्त माहिती तसेच शैक्षणिक अर्हता व अनुभव याचा तपशील भरण्याकरिता उपलब्ध होईल.

सदर पद भरतीच्या अनुषंगाने पुढील सर्व कार्यवाहीकरिता उमेदवारास नोंदणी झाल्यानंतर प्राप्त होणारा युजर आय डी व पासवर्ड जतन करुन ठेवणे आवश्यक राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular