Tuesday, October 3, 2023
HomeCareerदिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ भरती, 1841 जागांसाठी नोकरीची संधी | DSSSB...

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ भरती, 1841 जागांसाठी नोकरीची संधी | DSSSB Recruitment

दिल्ली | दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB Bharti 2023) येथे विविध रिक्त पदांसाठी भरती केली जात आहे. एकूण 1841 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार असून यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 स्पटेंबर 2023 आहे.

याठिकाणी ‘संगीत शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (विशेष शिक्षण), प्रयोगशाळा सहाय्यक, सहाय्यक, सांख्यिकी सहाय्यक, EVGC, पदव्युत्तर शिक्षक (PGT), इतर’ पदांच्या एकूण 1841 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.

निवड एकस्तरीय परीक्षा योजनेद्वारे केली जाईल. कॅल्क्युलेटर, लॅपटॉप, पामटॉप, इतर डिजिटल इन्स्ट्रुमेंट/ मोबाईल/ सेल फोन, पेजर/ इलेक्ट्रॉनिक घड्याळे आणि कोणत्याही धातूच्या वस्तू इत्यादींचा वापर करण्यास परवानगी नाही.

संबंधित पदाच्या भरती नियमांमध्ये नमूद केल्याप्रमाणे आवश्यक पात्रता नसलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातDSSSB Notification 2023
ऑनलाईन अर्ज करा (17 ऑगस्ट पासून)DSSSB Application 2023
अधिकृत वेबसाईटwww.dsssb.delhi.gov.in 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular