राज्यात डॉक्टर, तंत्रज्ञांच्या साडेचार हजार पदांची भरती; राज्य सरकारची घोषणा | Doctor-Technician Recruitment

नागपूर | राज्यात लवकरच (Recruitment Of Doctor, Technicians) डॉक्टर, तंत्रज्ञांच्या साडे चार हजार जागांवर भरती करण्यात येणार असल्याची घोषणा गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केली. ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या (TCS) माध्यमातून पार पडणार आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळ हिवाळी अधिवेशना दरम्यान महाजन यांनी ही घोषणा केली.

“सध्या 28 टक्के पदे रिक्त”
अधिवेशनात गिरीश महाजन म्हणाले, आम्हीं एमपीएसच्या माध्यमातून 300 डॉक्टर भरले आहेत. सध्या 28 टक्के पदे रिक्त आहेत. या संदर्भात आम्ही मेडिकल बोर्ड तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून लवकरच पदभरती करण्यात येईल. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. एमपीएससी (MPSC) मार्फत जागा भरण्यास वेळ लागतो. महाजन पुढे म्हणाले, आत्तापर्यंत 10 टक्के हॉस्पिटल आणि 90 टक्के हाफकिन अशी औषधे खरेदी होती, मात्र आता हे प्रमाण आम्ही बदलत आहोत. आता 30 टक्के हॉस्पिटल आणि 70 टक्के हाफकिन अशी औषधं खरेदी केली जाईल.

“जास्तीत जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध करू”
नागपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे रुग्णांची संख्या मोठी असते. व्हेंटिलेटर तत्काळ उपलब्ध करायची म्हटलं तरी ते शक्य होतं नाही. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. कारण रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात आहे. लवकरच जास्तीत जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात येईल असे महाजन म्हणाले.