Tuesday, October 3, 2023
HomeCareerवैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती | DMHS...

वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती | DMHS Recruitment 2023

मुंबई | वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय दमण, दीव & दादरा, नगर हवेली, आणि सिल्वासा अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (DMHS Recruitment 2023) केली जाणार आहे. एकूण 99 रिक्त जागा भरण्यात येणार असून त्यासाठीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

 DMHS Recruitment 2023 – ‘प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षक, आणि ज्येष्ठ निवासी, आरोग्य शिक्षक, चिकित्सक, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, जनरल सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, पॅथॉलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक’ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य वैद्यकीय अधिकारी कार्यालय, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय, दादरा आणि नगर हवेली, सिल्वासा-396230

PDF जाहिरात DMHS Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट ddd.gov.in

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे. दस्तऐवज पडताळणीसाठी तुम्हाला सर्व मूळ प्रमाणपत्रे आणि दस्तऐवज पडताळणीसाठी मूळ प्रमाणपत्रांसह प्रमाणित छायाप्रतीच्या एका संचासह आणणे आवश्यक आहे. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular