गोंदिया | गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे एकूण 350 विधी स्वयंसेवकांची नियुक्ती (DLSA Gondia Recruitment 2023) करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र व्यक्तींनी सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अर्ज, तसेच आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रतीसह दिनांक 7 जुलै 2023 पर्यंत दाखल करावा.
जिल्हा विधी सेवा प्राधिकण, गोंदिया तर्फे माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली तर्फे निर्धारित केलेल्या “विधी स्वयंसेवक” सुधारित योजनेअंतर्गत हे अर्ज मागविण्यात येत आहेत. (DLSA Gondia Recruitment 2023)
पात्रता – विधी स्वयंसेवक म्हणून नेमणुकीसाठी खालील व्यक्ती अर्ज करु शकतात:
1. शिक्षक (निवृत्त शिक्षकासह)
2. निवृत्त शासकीय कर्मचारी किंवा जेष्ठ नागरीक
3. एम.एस.डब्लु. विद्यार्थी आणि शिक्षक
4. अंगणवाडी सेविका
5. डॉक्टर / चिकित्सक
6. विद्यार्थी/ विधी विद्यार्थी (आजपावेतो विधीज्ञ म्हणून नोंद नसलेले)
7. गैर राजकीय, सेवाभिमुख स्वयंसेवी संस्था आणि क्लबचे सदस्य.
8. महिला अतिपरिचित गटाचे सदस्य, मैत्री संघ आणि उपेक्षित/असुरक्षित गटांसह इतर स्वयंसेवी बचत गट महिला सदस्य.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –
- गोंदिया व गोरेगाव तालुकाकरीता – मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, विधी सेवा सदन, जिल्हा व सत्र न्यायालय, गोंदिया. पिन क. ४४१६०१.
- आमगाव व सालेकसा तालुकाकरीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, आमगाव.
- तिरोडा तालुकाकरीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, तिरोडा
- देवरी तालूकाकरीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, देवरी.
- सडक अर्जुनी तालुकाकरीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, सडक अर्जुनी.
- अर्जुनी मोरगाव तालुकाकरीता – मा. अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी व फौजदारी न्यायालय, अर्जुनी मोरगाव
PDF जाहिरात – DLSA Gondia Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – gondia.gov.in
सदर भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. आलेल्या अर्जातून चाळणीद्वारे उमेदवारास मुलाखतीस बोलविण्यात येईल. दाखल अर्जाच्या संख्येनुसार अर्जदारांना मुलाखतीची तारीख स्वतंत्ररित्या मा. जिल्हा न्यायालय, नांदेड च्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.