सध्या शैक्षणिक क्षेत्रात नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध आहेत. शिक्षण संचालनालय, UT प्रशासन दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव अंतर्गत देखील विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या पदभरती अंतर्गत 42 रिक्त जागा भरल्या जाणार असून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदभरतीमध्ये 10वी, 12वी उत्तीर्णांनांही नोकरीची संधी मिळणार आहे.
या पदभरती अंतर्गत “केअरटेकर/ मदतनीस, प्राथमिक शाळा शिक्षक, उच्च प्राथमिक शाळा शिक्षक, सहाय्यक शिक्षक, अर्धवेळ प्रशिक्षक, लेखापाल, मल्टी टास्किंग स्टाफ, रिसोर्स पर्सन आणि CRC समन्वयक आणि पदव्युत्तर शिक्षक (PGTs)” पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 & 30 जुन 2023 (पदांनुसार) आहे.
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर समग्र शिक्षा, BRC भवन, मुख्य बाजार, DIU या पत्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 & 30 जुन 2023 (पदांनुसार) असून देय मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
PDF जाहिरात – https://shorturl.at/ot149
PDF जाहिरात (पदव्युत्तर शिक्षक (PGTs) – https://shorturl.at/iuDN3

