आल्या​चे विविध फायदे | Different Benefits of Ginger

आल्याच्या लागवडीसाठी उष्ण आणि दमट हवामानाची गरज असते, त्यामुळे उष्ण कटीबंधात सर्वत्र त्याची लागवड केली जाते. मुरुमाड,ठिसूळ आणि वालुकामय शेतजमिनीमध्ये आले उगवू शकते. आले हे अडीच-तीन फुट वाढणाऱ्या झुडुपाची, जमिनीखाली उगवणारी, पिवळ्या रंगाची मुळी होय. आले दीर्घकाळ टिकण्यासाठी उन्हात तसेच काही ठिकाणी दुधात बुडवून वाळवून त्याची सुंठ बनवतात. सुंठ आल्यापेक्षा उग्र असते.सुंठीचे तेल काढतात. ओल्या मातीत ठेऊन आले बराच काल टिकते. जगभर आल्याचा उपयोग मसाल्याचा पदार्थ आणि औषधी म्हणून होतो. आल्याला ‘महा औषधी‘ असेही म्हणतात. आल्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह व झिंक(अल्प प्रमाणात) आहेत. क, ब३ व ब६ ही जीवनसत्वे आणि फार थोड्या प्रमाणात पिष्टमय पदार्थ आल्यात आहेत. तसेच आले वातहारकही आहे.

पाहूया आल्या​चे फायदे | Benefits of Ginger in Marathi

१. रोगप्रतिकार शक्ती l Immunity Booster- दररोजच्या आहारात आल्याचे प्रमाणात सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

२. कफ l Cough- सुंठ आणि खडीसाखर यांचा काढा घेतल्याने कफ पातळ होण्यास मदत होते.

३. अनियमित मासिक पाळी l Irregular menstrual periods – मासिक पाळी अनियमित असेल तर पाळीचे दिवस जवळ आल्यानंतर आले टाकून उकळलेले पाणी दिवसातून दोनवेळा घ्यावे.

४. माईग्रेन l Migraine – माईग्रेन सारख्या आजारावर आल्याचा चहा उपयुक्त ठरतो. तसेच कोणत्याही प्रकारची डोकेदुखी असो. आले ठेचून तची पेस्ट कपाळावर लावावी किंवा आल्याचा रस टाळूवर चोळावा.

५.पचनविकार l Digestive Disorder- जेवणापूर्वी छोटा आल्याचा तुकडा मीठ लाऊन चावून चावून खावा, यामुळे खाल्लेले व्यवस्थित पचन होते.

६. मधुमेह l Diabetes – मधुमेहाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळी उपाशीपोटी आल्याचे पाणी पिल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते.

७. बद्धकोष्टता – जेवणानंतर पोटात गॅस झाला असल्यास आल्याचे चाटण चाटावे. ते आतड्याची हालचाल वाढविते व पोटातील वेदना कमी करते

८. कोलेस्टेरॉल l Cholesterol- आल्याचा रस नियमित घेतल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते.

आल्याच्या सेवनाने अनेक आजार बरे होतात. हे खाल्ल्याने रक्तदाब आणि पोटाचे आजार तसेच मायग्रेनच्या दुखण्यामध्ये आराम मिळतो. दुसरीकडे, कच्च्या आल्याचे सेवन केल्याने सर्दी-खोकल्यासारखे व्हायरल इन्फेक्शन बर्‍याच प्रमाणात टाळता येते. 

(टीप – आले उष्ण असते त्यामुळे उन्हाळ्यात आल्याचा वापर कमी करावा. उच्च रक्तदाब असल्यास आले खाऊ नये.)