Career

AI चा नोकऱ्यांना फटका! डेल कंपनीच्या अनेक अधिकाऱ्यांना घरचा रस्ता; 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार | Dell Layoffs

जगातील आघाडीच्या संगणक उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या डेलनेही आता कर्मचारी कपातीची (Dell Layoffs) घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या कर्मचारी संख्येत 10% कमी करण्याचा निर्णय घेतला असून याचा फटका सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांना बसणार आहे. विशेष म्हणजे, या कपातीचा सर्वात मोठा फटका कंपनीच्या विक्री विभागाला बसणार आहे. इंटेलनंतर आता डेलनेही कर्मचारी कपातीची घोषणा केल्याने आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

AI वर फोकस वाढवण्याचा प्रयत्नDell Layoffs

बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, डेलने या कपातीची माहिती कर्मचाऱ्यांना एका आंतरिक मेमोद्वारे दिली आहे. कंपनी आपल्या विक्री पद्धतीत बदल करणार असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित विक्री युनिट तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. याचा अर्थ, कंपनी आता AI तंत्रज्ञानावर अधिक भर देणार आहे.

ग्लोबल सेल्स मॉडर्नायझेशन स्कीम

डेलने या कपातीला \’ग्लोबल सेल्स मॉडर्नायझेशन अपडेट\’ हे नाव दिले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे कंपनीला नवीन दिशा मिळेल आणि व्यवसाय वाढण्यास मदत होईल. याशिवाय, कंपनी पुनर्रचना आणि गुंतवणूक याबाबतही नवीन निर्णय घेणार आहे.

Dell Layoffs विक्री विभागाला सर्वात मोठा फटका

डेलच्या विक्री विभागातील अनेक कर्मचारी या कपातीमुळे बेरोजगार झाले आहेत. याशिवाय, कंपनीतील व्यवस्थापक, संचालक आणि उपाध्यक्षांसारख्या वरिष्ठ पदांवरील कर्मचारीही याचा बळी ठरले आहेत. काही कर्मचारी 20 वर्षांहून अधिक काळापासून कंपनीशी संबंधित होते. याशिवाय, मार्केटिंग आणि ऑपरेशन विभागालाही याचा फटका बसला आहे.

Dell Layoffs 2023 : मध्येही झाली होती मोठी कपात

गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये डेलने सुमारे 13,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. त्यामुळे या नवीन कपातीनंतर कंपनीतील कर्मचारी संख्यात मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षी जगभरात मंदी आल्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गेल्या होत्या.

Back to top button